भारतीय संघात युद्ध पेटलं, रोहित कसोटीतून बाहेर तर विराटने घेतला ‘हा’ मोठा निर्णय !

नवी दिल्ली : टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिका दौरा मोठा चर्चेत त्यामुळे भारतासाठी सतत तणाव वाढत आहे. आधी कसोटी संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा दुखापतीमुळे कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. तर, आता विराट कोहलीने वनडे मालिकेतून आपले नाव मागे घेतले आहे. बीसीसीआयने विराट कोहलीला वनडेच्या कर्णधारपदावरून हटवल्यानंतर हा प्रकार घडला आहे.

मिळालेल्या वृत्तानुसार, विराट कोहलीने वनडे मालिकेतून माघार घेतली आहे. विराट कोहलीने बोर्डाला कळवले होते की 11 जानेवारीला त्याची मुलगी वामिकाचा पहिला वाढदिवस आहे आणि त्याला हा वाढदिवस आपल्या कुटुंबासोबत साजरी करायची आहे.

दरम्यान, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरी कसोटी 11 जानेवारीपासून खेळवली जाणार आहे आणि ती विराट कोहलीची 10 0वी कसोटी असेल, त्यामुळे या कसोटीनंतर विराट कोहली एकदिवसीय मालिकेदरम्यान कुटुंबासोबत वेळ घालवू इच्छित आहे.

विराट कोहलीला कर्णधारपदावरून हटवून रोहित शर्माकडे कमान दिल्यानंतर अशा बातम्या येणे भारतीय क्रिकेट संघासाठी शुभ संकेत नाहीत. बोर्डाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी विराटकडून कर्णधारपद काढून घेण्याचे कारण देखील सांगितले होते. विराटला टी-20 चे कर्णधारपद सोडण्यास मनाई करण्यात आली होती पण त्याला ते मान्य नव्हते, असे सौरव गांगुलीने सांगितले होते.

त्यानंतर निवड समिती आणि बोर्डाने मिळून निर्णय घेतला की मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये वेगवेगळे कर्णधार ठेवता येणार नाहीत, त्यामुळे रोहितकडे टी-२० आणि वनडेचे कर्णधारपद सोपवण्यात आले.

विराट कोहलीच्या आधी कसोटी संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा हॅमस्ट्रिंगमध्ये ताण आल्याने ३ आठवडे मैदानापासून राहणार आहे. रोहित शर्माच्या जागी गुजरातचा फलंदाज प्रियांक पांचाळचा कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे.

टीम इंडियाला 26 डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिकेत तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. कसोटी मालिकेनंतर, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिका 19 जानेवारीपासून सुरू होईल, पहिला एकदिवसीय सामना 19 जानेवारीला बोलंड पार्क येथील पार्ल येथे खेळवला जाईल. दुसरा एकदिवसीय सामना 21 जानेवारी रोजी पार्ल येथे आणि तिसरा एकदिवसीय सामना 23 जानेवारी रोजी केपटाऊन येथे खेळवला जाईल. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने 2018 मध्ये 6 सामन्यांची एकदिवसीय मालिका 5-1 ने जिंकली होती.

हे देखील पहा