Amol Kolhe | निवडणुकीच्या प्रचारात मुळ मुद्दे भरकटवले जातायेत

Amol Kolhe | २०२४ च्या निवडणूक प्रचारात मुळ मुद्दे भरकटवले जाताय. वगद्दारी विरुद्ध एकनिष्ठा या विरोधातली लढाई सोबतचझ मोदी विरुद्ध सर्वसामान्य जनता अशी ही निवडणूक असल्याचं प्रतिपादन खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी केलं.

महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे आज भोसरी मतदार संघातील रुपीनगर, तळवडे, त्रिवेणीनगर, कृष्णानगर या भागातील दौऱ्यावर होते. यावेळी त्यांच्यासोबत धनंजय आल्हाट, सुलभा उबाळे, आशाताई भालेकर, दादा नरळे, नितीन बोडे, इम्रान शेख, अशोक पवार आदी सहभागी होते.

नागरिकांशी संवाद साधताना डॉ. कोल्हे म्हणाले किझ संविधान वाचविण्यासाठीची ही मोठी लढाई या लोकसभेच्या माध्यमातून आपण लढत आहोत. पण मूळ मुद्दापासून निवडणूक भरकटवली जात आहे.

मी, माझं, माझ्यासाठी याच्या पलीकडे जाऊन देश आणि देशातील जनता यांच्या प्रति माझी बांधिलकी आहे. त्यामुळे ही निवडणूक कोणाची पहिली असली काय किंवा शेवटची असली काय त्याने महागाई कमी होणार आहे का ? असा सवाल ही डॉ. कोल्हे यांनी केला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Archana Patil | अर्चना पाटील यांच्या विजयासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार करतायत सर्वतोपरी प्रयत्न

Omraje Nimbalkar Vs Archana Patil: धाराशिवचे उमेदवार ओमराजे निंबाळकर व अर्चना पाटील यांची संपत्ती किती?

Uddhav Thackeray | फडणवीस म्हणाले होते आदित्यला मुख्यमंत्रिपदासाठी तयार करतो अन् मी दिल्लीला जातो; ठाकरेंचा दावा