Sunetra Pawar | ठाकरे कुटुंबाशी माझा व्यक्तिगत स्नेह, शर्मिला माझी खास मैत्रिण; सुनेत्रा पवार काय म्हणाल्या?

Sunetra Pawar | मनसे नेते राज ठाकरे यांच्यासह ठाकरे कुटुंबाशी माझा व्यक्तिगत स्नेह राहिला आहे. त्यातही शर्मिला ठाकरे या माझ्या खास मैत्रीण असल्याचे बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी सांगितले. मला निवडणुकीत सहकार्य करणाऱ्या मनसैनिकांची जाणीव ठेवून त्यांच्या हाकेला नेहमीच प्रतिसाद असेल अशी ग्वाही देखील सुनेत्रा पवार( Sunetra Pawar) यांनी दिली. त्या बारामतीत शुक्रवारी पार पडलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठकीत बोलत होत्या.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्याच्या सूचना पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. त्यानुसार बारामती लोकसभा मतदारसंघातही मनसेचे कार्यकर्ते सक्रीय झाले आहेत. महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी बारामती लोकसभा मतदारसंघातील मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बारामती येथे पार पडली.

या बैठकीला मनसेचे नेते दिलीप धोत्रे, मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष सुधीर पाटसकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, मनसेचे जिल्हाध्यक्ष पोपट सुर्यवंशी, संतोष दासवडकर यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बारामती लोकसभा मतदारसंघातील मनसे कार्यकर्ते जोमाने काम करून सुनेत्रा पवार यांच्या विजयात वाटा उचलतील. अशी ग्वाही मनसे पदाधिकाऱ्यांनी यावेळी सुनेत्रा पवारांना दिली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Shivajirao Adhalrao Patil Vs Amol Kolhe : आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे यांचा उद्या भोसरी विधानसभेत प्रचार दौरा

Baramati Loksabha | सुप्रिया सुळे आणि वहिनी सुनेत्रा पवार यांच्यात कोणाकडे आहे जास्त संपत्ती?

Madhav Bhandari | ‘देव-धर्माचा विषय शरद पवारांच्या “सात बाऱ्या’ वर कधीच दिसला नाही, त्यामुळे…’, माधव भंडारी यांचा टोला