Sanjay Raut | मनसेच्या नेत्याने भरला संजय राऊत यांचा मनोरुग्णालयाचा फॉर्म, कारण घ्या जाणून

शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे सातत्याने बेताल वक्तव्ये करत असतात, ज्यामुळे ते टीकेचे धनी ठरतात. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजपाला बिनशर्त पाठींबा दिला आहे. तेव्हापासून संजय राऊत राज ठाकरेंवर बोचरी टीका करत आहेत. आता मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी संजय राऊत यांचा वेड्याच्या रुग्णालयात ऍडमिशन फॉर्म भरला आहे.

“संजय ऊर्फ मनोरुग्ण राऊत (Sanjay Raut) यांची काही दिवसातील विधान पाहता यांना मनोरुग्णालाय दाखल करणं गरजेच आहे. कधी त्यांना पवार साहेब या देशाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार वाटतात. कधी राहुल गांधी पंतप्रधानपदाचे उमेदवार वाटतात. उद्धव पंतप्रधानपदाचे उमेदवार का असू नये? असं ते बोलतात. मनसेच्या वतीने पुणे येरवडा येथे असलेल्या मनोगरुग्णालयाचा संजय राऊत यांचा एडमिशन फॉर्म भरला आहे” असं गजनान काळे यांनी म्हटलं आहे. त्यांनी संजय राऊत यांना गेट वेल सून म्हटलं आहे. “अ‍ॅडमिट होऊन योग्य उपचार घेऊनच आणि पूर्ण बरे होऊनच परत यावे…काळजी घ्या … !!!” असं सुद्धा म्हटलं आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Chandrashekhar Bawankule | महाराष्ट्राचा महानालायक कोण? या स्पर्धेत उद्धव ठाकरे पहिले येतील, फडणवीसांवरील टीकेला बावनकुळेंचं प्रत्युत्तर

Sunil Tatkare | संविधान बचाव नावाने विरोधकांनी प्रचाराची वैचारिक पातळी खाली आणलीय

Narendra Modi | जनतेवर विश्वास नसलेल्या काँग्रेस आघाडीवर विश्वास ठेवू नका! पंतप्रधान मोदी यांचे आवाहन