जाणून घ्या जागतिक व्याघ्र दिन का साजरा केला जातो ?

Suchita Gaikwad/Pune: गेल्या काही शतकात 97 % टक्के वाघांची संख्या घटल्याचे आढळून आले आहे. आणि जवळपास  3000 वाघच बाकी असल्याचे निदर्शनास आले आहे.वाघांची घटती संख्या आटोक्यात यावी तसेच त्यांचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या प्रजातीला जपण्यासाठी जागतिक व्याघ्र दिन साजरा केला जातो.जागतिक स्तरावर 29 जुलै हा दिवस इंटरनॅशनल टायगर डे(International Tiger Day)/जागतिक व्याघ्र दिन म्हणून साजरा करण्यात येतो. वाघांच्या संवर्धनाच्या महत्वाबाबत व्यक्ती, संस्था आणि सरकार यांच्यात जागरूकता निर्माण करणे हा या दिनाचा उद्देश आहे.

इतिहास:   2010 पासून दरवर्षी 29 जुलैला आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा केला जात आहे 29 जुलै 2010 रोजी गेल्या काही शतकात जवळजवळ 97 टक्के भाग गायब झाल्याचे आढळून आले. वाघ नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याने वन्य परिस्थिती बिघडू नये म्हणून रशियातील सेंड पीटर्सबर्ग टायगर समिटमध्ये अनेक देशांनी करार केला. 29 जुलै 2010 रोजी रशिया येथे टायगर सिमेंट इव्हेंट आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात अनेक देशांनी भाग घेतला आणि वाघांच्या करारावर स्वाक्षरी केली. जागतिक स्तरावर वाघांच्या घटत्या लोकसंख्ये बाबत जनजागृती करण्यासाठी आणि वाघांचे संरक्षण (Protection of tigers) करण्यासाठी हा करार करण्यात आला. यासह या कार्यक्रमातील सहभागी देशांनी ठरवले की वाघांची संख्या कमी असलेले देश 2022 पर्यंत वाघांची संख्या दुप्पट करतील. वाघांच्या प्रजातीचे जतन करण्यासोबतच वाघांच्या अधिवासाचे रक्षण आणि विस्तार करण्याचा प्रयत्न या कराराद्वारे केला जाईल, असे या करारात ठरवले गेले.

वर्ल्ड वाईल्ड फंड फॉर नेचर (WWF)ॲनिमल वेल्फेअर (Animal Welfare)आणि स्मित सोन्या इन्स्टिट्यूट यांसह अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांद्वारे आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा केला जातो. डब्ल्यू डब्ल्यू एफ च्या मते सध्याच्या वन्य वाघांची लोकसंख्या 3900 आहे जगातील सुमारे 70 टक्के वाघ भारतात आहेत.

जागतिक वन्य जीव निधी नुसार, गेल्या 150 वर्षात वाघांच्या लोकसंख्येपैकी अंदाजे 95 टक्के घट झाली आहे.त्यामुळे या दिवसाचा उद्देश वन्य वाघांना वाचवण्यासाठी योग्य ती कारवाई करण्यासाठी सर्वांना प्रोत्साहित करण्याचा आहे.तसेच सर्व देशांनी बेकायदेशीर शिकार, वन्य जीवन व्यापार, मानव- वन्यजीव संघर्ष आणि अधिवास नष्ट होण्यावर कारवाई केल्यास आपण या प्रजाती नष्ट होण्यापासून वाचू शकतो.वर्ल्ड वाईल्ड फंड फॉर नेचर ॲनिमल वेल्फेअर आणि स्मित सोन्या इन्स्टिट्यूट यांसह अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांद्वारे आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा केला जातो. WWF च्या मते सध्याच्या वन्य वाघांची लोकसंख्या 3900 आहे जगातील सुमारे 70 टक्के वाघ भारतात आहेत.