‘त्या चुXX उद्धव ठाकरेला पण सांग’, निलेश राणेंनीही शिवीगाळ करत संजय राऊत यांना दिले प्रत्युत्तर 

संज्या तू जिथे भेटशील तिथेच तुला फटके टाकणार,एवढं नक्की...

मुंबई – केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते नारायण राणे आणि ठाकरे गटाचे (shiv sena वाचाळवीर नेते खासदार संजय राऊत (shiv sena sanjay raut) यांचे शाब्दिक युद्ध काही थांबायला तयार नाही.  नुकताच माध्यमांशी संवाद साधत असताना संजय राऊत यांनी नारायण राणे यांच्याबद्दल अश्लाघ्य शब्द वापरला आहे.(sanjay raut news today).

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज मुंबईत पत्रकारांशी बोलत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्यावर टीका केली आहे. यावेळी पत्रकारांनी नारायण राणे यांच्या टीकेबद्दल विचारले असता, ते XXX आहे, अशा शब्दांत राऊत यांनी राणेंवर टीका केली.

यानंतर आता माजी खासदार निलेश राणे (Nilesh Narayan Rane) चांगलेच खवळले आहेत. त्यांनी देखील तशाच स्वरुपाचे अपशब्द वापरत संजय राऊतांवर पलटवार केला आहे. यावेळी निलेश राणेंनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबतही (Uddhav Thackeray) अपशब्द वापरले आहेत.

ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करत निलेश राणेंनी (Nilesh Rane twitter) संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले, ‘त्या भिXXXX संजय राऊत याने जी भाषा वापरली, आता त्या भाषेमध्येच उत्तर देणार. फक्त उत्तर न देता.. संज्या तू जिथे भेटशील तिथेच तुला फटके टाकणार,एवढं नक्की… आणि त्या चुXX उद्धव ठाकरेला पण सांग तुझ्या नादाला लागणार.. तर अर्धा तर संपलाय, बाकीचा उरलासुरला संपायला वेळ लागणार नाही.’ अशा शिवराळ भाषेत निलेश राणेंनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.