तुमच्या मुलांसाठी या LIC योजनेते गुंतवणूक करा,150 रुपयांची बचत करा आणि 19 लाख रुपये मिळवा

भारतीय आयुर्विमा महामंडळ लोकांसाठी अनेक योजना आणते.ज्यामध्ये लोकांना गुंतवणूक करून फायदा मिळतो. येथे लोकांना विम्याबरोबर चांगला निधीही मिळतो. तुम्हाला तुमच्या मुलांसाठी LIC मध्ये गुंतवणूक करायची असेल. जेणेकरून त्यांचे भविष्य सुरक्षित होईल. किंवा त्याला नोकरी मिळेपर्यत अधिक पैसे मिळू शकतील. तर तेथे चिल्ड्रेन मनी बॅक प्‍लॅन आहे.या योजनेबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

आयुर्विमा महामंडळाने नवीन चिल्ड्रेन मनी बॅक प्‍लॅन आणाला आहे.यामध्ये 25 वर्षासाठी गुंतवणूक करायची आहे.यामध्ये मॅच्युरिटी रक्कम तुम्हाला हप्त्यात दिली जाते. तुमचे मूल 18 वर्षाचे असताना पहिला हप्ता आणि दूसरा हप्ता मूल वीस वर्षांचे झाल्यावर आणि तिसरा तुमचे मूल 22 वर्षांचे झाल्यानंतर तसेच तुम्हाला बोनस देखील मिळतो. जेव्हा मुलं 25 वर्षांचे झाल्यानंतर त्याला संपूर्ण रक्कम मिळते. उर्वरित 40 टक्के रक्कम इतर रक्कमेसोबत बोनस दिला जातो.

पॉलिसी घेण्याची मर्यादा ही शून्य ते 12 वर्ष आहे. 60 टक्के रक्कम हप्त्यामध्ये दिली जाते. 40 टक्के रक्कम मुदतपूर्व वेळी बोनस दिली जाते. या अंतर्गत 1 लाखांचा किमान विमा मिळू शकतो.तर कमाल मर्यादा नाही.दररोज जर 150 रुपयांची बचत करत असेल तर विम्याचा प्रीमियम वार्षिक 55 हजार रुपये दिला जातो.म्हणजेच 365 दिवसांनुसार तुम्हाला 25 वर्षात एकूण 14 लाख रुपये जमा करावे लागतील. 14 लाख रुपये जमा केल्यानंतर तुम्हाला एकूण 19 लाख रुपये मिळतील.