IPS Officer Accident | बंदोबस्तावर तैनात असलेल्या IPS अधिकाऱ्याला मंत्र्यांच्या ताफ्याने चिरडलं, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

Telangana IPS Officer Accident | तेलंगणा सरकारचे मंत्री श्रीधर बाबू  (Shridhar Babu) यांच्या ताफ्याने आयपीएस अधिकारी परितोष पंकज (IPS Paritosh Pankaj) यांना धडक दिली. या धडकेत पंकज यांना किरकोळ दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मंत्र्यांच्या ताफ्यात उपस्थित असलेल्या वाहनाने आयपीएस अधिकाऱ्याला धडक (IPS Officer Accident) दिली.भद्राद्री कोठागुडेम जिल्ह्याचे एएसपी परितोष पंकज मंत्र्यांच्या ताफ्यात जात असलेल्या एका वाहनाने त्यांना मागून धडक दिल्याने ते जखमी झाले, अशी माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने दिली. घटनेच्या वेळी ते कर्तव्यावर होते. दरम्यान मागून येणाऱ्या एका वाहनाने त्यांना धडक दिली. कारला धडकताच तो जमिनीवर कोसळला.

एएसपी रुग्णालयात दाखल
मात्र, घटनास्थळी उपस्थित असलेल्या इतर पोलिसांनी त्यांना तात्काळ उचलून उपचारासाठी रुग्णालयात नेले. भद्राद्री कोठागुडेम जिल्ह्यात तेलंगणा सरकारमधील मंत्री श्रीधर बाबू यांचा कार्यक्रम होता. हा अपघात झाला तेव्हा एएसपी परितोष पंकज त्यांच्या कार्यक्रमानिमित्त बंदोबस्तावर तैनात होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

CAA Act | भारताचा CAA कायदा काय आहे? ज्याबाबत मोदी सरकारने अधिसूचना जारी केली, वाचा सर्वकाही

Pankaja Munde | पाच वर्षांचा वनवास खूप झाला, आता वनवास नको

Ajit Pawar | पुण्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाला शासनाचे प्राधान्य