दुकानांवर मराठी पाट्या नसल्यास होणार कारवाई, नियमाचे उल्लंघन केल्यास दंडाची तरतूद

Shop Marathi Board: महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, २०१७ च्या कलम ३६ क मधील तरतूदीनूसार, प्रत्येक आस्थापनेचा नामफलक, देवनागरी लिपीतील मराठी भाषेमध्ये असेल. देवनागरी लिपीतील मराठी भाषेव्यतिरीक्त इतर कोणत्याही भाषेतील व लिपीतील नामफलक देखील असु शकतील, परंतू मराठी भाषेतील अक्षरलेखन, नामफलकावर सुरूवातीलाच लिहीणे आवश्यक असेल आणि मराठी भाषेतील अक्षरांचा टंक आकार, इतर कोणत्याही भाषेतील अक्षरांच्या टंक आकारापेक्षा लहान असणार नाही. तसेच, ज्या आस्थापनांमध्ये मद्य पुरविले जाते किंवा विकले जाते, अशा आस्थापना, नामफलकावर महान व्यक्तींचे किंवा गड किल्ल्यांची नावे लिहीणार नाही.

जी आस्थापना, या अधिनियमाच्या तरतूदींचे उल्लंघन करील, तो एक लाख रुपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाच्या शिक्षेस आणि उल्लंघन करने चालू ठेवल्यास असे उल्लंघन ज्या कालावधीकरिता चालू ठेवले असेल त्या कालावधीतील प्रत्येक दिवसासाठी दोन हजार रुपयांपर्यंत दंड असू शकेल या अतिरिक्त द्रव्यदंडाच्या शिक्षेस पात्र असेल. परंतू, द्रव्यदंडाची एकूण रक्कम, नोकरीवर ठेवलेल्या प्रति कर्मचाऱ्यामागे दोन हजार रुपयांपेक्षा अधिक असणार नाही, अशी अधिनियमात तरतूद आहे.

या अधिनियमातील तरतूदीनूसार होणारी कारवाई टाळण्यासाठी, सर्व दुकाने / आस्थापना धारकांना नामफलक, नियमानूसार करण्याचे आवाहन कामगार उप आयुक्त, कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘मुस्लिम मुलाशी लग्न केल्यास हिंदू मुली त्यांचे हक्क गमावतील’, भाजप नेत्याचे वादग्रस्त विधान

Cyclone Michaung चा हाहाकार, चेन्नईत पाच जणांचा मृत्यू; एअरफील्ड बंद

अफेअरच्या चर्चांदरम्यान जान्हवी कपूरचं बड्या नेत्याच्या नातवाबरोबर महाकाल दर्शन – Video