Vasant More | वसंत मोरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाटेवर? सुप्रिया सुळेंना मिळणार मोठी मदत?

मनसेचे नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी मंगळवारी तडकाफडकी मनसेच्या प्राथमिक सदस्य आणि इतर सर्व पदाचा (Pune Vasant More Resigns) राजीनामा दिला. पुणे शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून आपल्या विरोधात होत असलेले पक्षांतर्गत गलिच्छ राजकारण व पक्षाप्रति असलेल्या आपल्या निष्ठेवर उपस्थित होत असलेले प्रश्नचिन्ह आपल्यासाठी अत्यंत वेदनादायी असल्याचे सांगत त्यांनी राजीनामा दिला. तसेच आपण आता मनसेत (MNS) परतण्याचे सर्व दोर स्वत:हून कापल्याचेही सांगितले होते. आता त्यांच्या राजीनाम्यानंतर वसंत मोरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.

आगामी निवडणूक पाहता खडकवासला, पुणे शहराचा काही भाग हा बारामती लोकसभा मतदारसंघात येतो. मनसे मध्ये असताना मोरे यांच्यावर खडकवासलामध्ये मोर्चे बांधणीची जबाबदारी होती. त्यामुळे लोकसभेसाठी सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना वसंत मोरे यांची मोठी मदत मिळू शकते.

विधानसभा निवडणुकीसाठी देखील वसंत मोरे यांना उमेदवारी देण्याचा राष्ट्रवादी विचार करू शकते. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात त्यांचे स्वागतच, असं शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी वसंत मोरे यांनी स्वतः शरद पवार यांची भेट घेतली होती. भेट राजकीय जरी नसली तरी सुद्धा राजकीय वर्तुळात या भेटी बाबत अनेक चर्चा सुरू होत्या. आता वसंत मोरे नेमका काय निर्णय घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

CAA Act | भारताचा CAA कायदा काय आहे? ज्याबाबत मोदी सरकारने अधिसूचना जारी केली, वाचा सर्वकाही

Pankaja Munde | पाच वर्षांचा वनवास खूप झाला, आता वनवास नको

Ajit Pawar | पुण्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाला शासनाचे प्राधान्य