Baramati Lok Sabha | बारामतीची जागा अजित पवारांनाच दिलीय, घोषणा करण्याचीही गरज नाही, भाजपच्या जेष्ठ नेत्याचा दावा

Baramati Lok Sabha Election 2024 | बहुप्रतिक्षित लोकसभा निवडणूक 2024 साठी भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत महाराष्ट्रातून मोठ्या नावांचा समावेश आहे. या यादीमध्ये महाराष्ट्रातील एकूण 20 उमेदवारांचा समावेश आहे. भाजपाने बारामतीची जागा (Baramati Lok Sabha) रिकामी सोडली आहे. ही जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणे निश्चित आहे. अशातच आता याच बारामतीबाबत भाजपच्या ज्येष्ठ नेत्यानं मोठं वक्तव्य केल्यानं चर्चांना उधाण आलं आहे.

बारामतीची जागा अजित पवारांना दिली आहे, त्यासाठी घोषणा करण्याचीही गरज नाही, असं भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले आहेत. बारामतीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) सुनेत्रा पवारच लढवणार हे जवळपास निश्चित झालं आहे. त्यामुळे बारामतीत आगामी लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार असा जंगी सामना रंगणार आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

BJP Candidate List : भाजपची दुसरी यादी जाहीर, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, मुरलीधर मोहोळ यांच्यासह 20 जणांची नावं

Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रालयातील दालनातील पाटी बदलली..

Rahul Gandhi | आदिवासीच देशाचे खरे मालक; जल, जंगल, जमीन हा हक्क काँग्रेस अबाधित ठेवणार