‘मंदिराच्या अधिकृत जागेवर अनधिकृत बांधकाम लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादानेच झालं असण्याची शक्यता आहे’

Pune – देशात सध्या ज्ञानव्यापी मशीदीचा (Gyanvapi Mosque) मुद्दा चांगलाच पेटला असताना आता पुण्यातही पुण्येश्‍वर (Punyeshwar) आणि नारायणेश्‍वर ( narayaneshwar) मंदिरांच्या जागी मशिदी बांधल्याचा दावा  केला जात आहे. या मंदिराच्या जागेवर छोटा शेख व बडा शेख यांच्या नावाने दर्गे उभारले आहेत. ज्ञान व्यापी प्रमाणे लवकरच या दर्ग्यांच्या ठिकाणी असलेल्या मूळ मंदिरांच्या मुक्तीसाठी लढा उभा केला जाईल, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस अजय शिंदे (Ajay Shinde) यांनी म्हटलं आहे.

यावरून पुण्यातील वातावरण आता तापू लागले असून संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे (Santosh Shinde of Sambhaji Brigade) यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. पुण्येश्वर आणि नारायणेश्वर (Punyeshwar and Narayaneshwar) मंदिराच्या जागेवर मस्जिद निर्माण कशी झाली याला पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation ) आणि इतर स्थानिक लोकप्रतिनिधींनी परवानगी कशी काय दिली…? मंदिराच्या अधिकृत जागेवर अनधिकृत बांधकाम करणे हा गुन्हा (Crime) असताना लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादानेच हे झालं असण्याची शक्यता आहे. कुणाच्याही अनधिकृत बांधकामाला आम्ही समर्थन देणार नाही. मात्र हे वाद निरर्थक आहेत.असं त्यांनी म्हटले आहे.

धार्मिक वाद निर्माण व्हावे यासाठी मंदिर-मस्जिद चा वाद निर्माण केला जात आहे. स्थानिक नगरसेवक, आमदार, खासदार यांच्या आशीर्वादाने मालकीच्या जागेवर अतिक्रमण होते. पुण्यातील कित्येक जागेवर लोकप्रतिनिधींचे ताबे आहेत दादागिरी करून त्यांच्या प्रॉपर्टी मिळवल्या आहेत. स्थानिक लोक प्रतिनिधींनी यांच्या आशीर्वादानेच मंदिरांच्या आरक्षित जागेवर दर्गा  मस्जिद निर्माण झाले आणि हे सगळे धर्माचं राजकारण करतात. इतिहासातील वाद वेळेस मिटवलेच ठेवले पाहिजे.असं त्यांनी म्हटले आहे.

मनसेचा नेमका दावा काय ?

अल्लाउद्दीन खिलजीचा (Allauddin Khilji) एक सरदार बडा अरब पुण्यावर चाल करुन आला त्यावेळी त्यानं हे भगवान शंकराचं मंदिर (Temple of Lord Shiva) उध्वस्त केलं. एक मंदिर नाही तर दोन मंदिरं उध्वस्त केली. पुण्येश्वर आणि नारायणेश्वर (Punyeshwar and Narayaneshwar) ही मंदिरं उध्वस्त केली. तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही दोन्ही मंदिरं कुठं आहेत. एक मंदिर शनिवारवाड्याच्या बरोबर समोर आहे. तर दुसरं मंदिर लालमहालाच्या पलीकडील बाजूला कुंभार वेसजवळ आहे. जिथं आज छोटा शेख दर्गा आहे. या सगळ्या मंदिरांच्या वर मशिदी निर्माण झाल्या आहेत, असा दावा अजय शिंदे यांनी केला आहे.