संभाजीराजेंच्या उमेदवारीबाबत राजेश टोपे म्हणाले…

नागपूर : छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांना शिवसेना पुरस्कृत नाहीतर शिवबंधन बांधून (build Shivbandhan) सेनेत प्रवेश केल्यानंतरच पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून पाठिंबा देणार असल्याचे शिवसेनेतर्फे स्पष्ट सांगण्यात आले आहे. याचा अर्थ शिवबंधन बांधले नाही तर शिवसेना पर्यायाचा विचार करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. शिवसेना शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर संभाजीराजे छत्रपती शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना आता एक मोठी बातमी समोर येत आहे.

संभाजीराजे छत्रपती शिवसेनेत प्रवेश करणार नाहीत. शिवसेनेच्या निमंत्रणाकडे संभाजीराजे पाठ फिरवली असून आज पहाटेच ते कोल्हापूरकडे रवाना झाले आहेत. त्यामुळे ते शिवसेनेत प्रवेश करणार नाहीत. हे स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार म्हणून संधी देण्याची संभाजीराजे यांच्याकडून मागणी झाल्याची माहिती आहे. शिवसेना आणि महाविकास आघाडी यावर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

याबाबत बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्या उमेदवारीचा निर्णय महाविकास आघाडीचे पक्षश्रेष्ठी घेतील अशी प्रतिक्रीया दिली. राजेश टोपे नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘शरद पवार यांच्या सुचनेनुसार प्रत्येक भागातील पक्ष संघटनेला वेळ देत आहे. इथल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करतोय. आरोग्य विभागाशी संबंधीत प्रश्न सोडवण्यावर भर देणार आहे. छत्रपती संभाजीराजे यांच्याबाबत महाविकास आघाडीचे पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, असंही राजेश टोपे म्हणाले. आम्ही सर्वच शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराचे आहोत. छत्रपती संभाजीराजे (Sambhaji Raje Chhatrapati) यांच्याबाबत आदर आहे. ते पूर्वश्रमीचे राष्ट्रवादीचे आहेत. त्यांचे पवार साहेब यांच्याशी प्रेमाचे संबंध आहेत, असंही टोपे म्हणाले.