अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरणी १० वर्षांनी लागला निकाल, सूरज पांचोलीला मोठा दिलासा

बॉलीवूड अभिनेत्री जिया खानच्या (Jiah Khan) मृत्यू प्रकरणी 10 वर्षांनी निकाल आला आहे. मुंबईच्या विशेष सीबीआय न्यायालयाने सूरज पांचोलीची (Suraj Pancholi) निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे जियाची आई राबिया यांना मोठा धक्का बसला आहे. यापुढे त्या सीबीआय न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणार आहे. जिया खान 3 जून 2013 रोजी मुंबईतील तिच्या घरी मृतावस्थेत आढळली होती. तिच्या निधनाने इंडस्ट्रीला धक्का बसला होता.

सूरज पांचोलीला मोठा दिलासा मिळाला आहे
जिया खान आत्महत्या प्रकरणी सीबीआय न्यायालयाने सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता केली आहे. या अभिनेत्यावर जियाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप होता. पुराव्याअभावी न्यायालयाने सूरजची निर्दोष मुक्तता केली आहे. सुरजवर कोणताही खटला चाललेला नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. या निकालानंतर अभिनेत्याने न्यायालयाचे आभार मानले आहेत. या निकालानंतर सूरजची आई जरीना वहाब यांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.