‘मलाही मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं’, रामदास आठवले यांनी व्यक्त केली इच्छा

सांगली- गेल्या बऱ्याच दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्रीपदाचा विषय चांगलाच चर्चेत आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्याला मुख्यमंत्री बनायला आवडेल, असे विधान दिले होते. त्यानंतर भावी मुख्यमंत्री म्हणज अजित पवारांचे बॅनरही लावण्यात आले होते. अजित पवारांबरोबरच भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांचे नावही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे. अशातच आता ‘मलाही मुख्यमंत्री व्हावं, असं वाटतं’ असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) म्हणाले आहेत. ते सांगलीत पत्रकार परिषदेत बोलत होते.

रामदास आठवले म्हणाले की, ”अजित पवारांना तिकडे संधी मिळेल,असे वाटत नाही. आम्हाला अजित पवारांची आवश्यकता नाही. अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यात चढाओढ सुरू आहे. पण जोपर्यंत एकनाथ शिंदे आहेत, तोपर्यंत दुसऱ्या कोणाचा नंबर लागणार नाही. शरद पवार यांनी एनडीए सोबत यायला पाहिजे, मी आलो आहे. तर पवार यांनी यायला हरकत नाही.”

ते म्हणाले, ”शरद पवार यांनी आता ठोसपणे निर्णय घ्यावा. त्याच बरोबर ज्यांनी यायचे आहे, असे सांगण्या पेक्षा शरद पवारांनी आमच्या सोबत यावे.”

https://youtu.be/WaMpnoKOwD4