JP Nadda | जेपी नड्डा मंत्री झाले आता भाजपला नवीन अध्यक्ष मिळणार? पक्षनेतृत्वात बदलाची चर्चा

JP Nadda | 18व्या लोकसभा निवडणुकीत एनडीएच्या विजयानंतर भाजप नेते नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. रविवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पंतप्रधानपदाची शपथ दिली. पीएम मोदींसह 30 कॅबिनेट मंत्री, 5 नेत्यांनी राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) म्हणून शपथ घेतली आणि 36 नेत्यांनी राज्यमंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली. भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनीही मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. मंत्र्यांच्या यादीत जेपी नड्डा (JP Nadda) यांचे नाव आल्याने भाजप संघटनेच्या सर्वोच्च नेतृत्वात म्हणजेच अध्यक्षपदात बदल होणार का, अशीही चर्चा होती.

‘एक व्यक्ती, एक पद’ हे भाजपचे धोरण

जानेवारी 2020 मध्ये जेपी नड्डा यांनी अमित शहा यांच्या जागी पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारले. नड्डा यांचा भाजप अध्यक्षपदाचा कार्यकाळ या महिन्यात संपणार आहे. भाजपच्या ‘एक व्यक्ती, एक पद’ या धोरणानुसार पक्षाला लवकरच नवा अध्यक्ष मिळणार आहे. अशा परिस्थितीत जेपी नड्डा यांच्या जागी भाजपचे अध्यक्ष कोण होणार? यावर चर्चा सुरू झाली आहे.

अमित शहा भाजपचे अध्यक्ष असताना पक्षाने 2014 आणि 2019 च्या दोन्ही लोकसभा निवडणुका मोठ्या फरकाने जिंकल्या होत्या. २०२४ ची लोकसभा निवडणूक भाजपने जेपी नड्डा यांच्या नेतृत्वाखाली लढवली होती. यावेळी भाजपने 441 जागांवर निवडणूक लढवली आणि 240 जागा जिंकल्या. केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी भाजपने 272 चा जादुई आकडा गाठता आला नाही. भाजपला तिसऱ्यांदा एनडीएतील घटक पक्ष म्हणजेच टीडीपी आणि जेडीयूच्या मदतीने केंद्रात सरकार स्थापन केले आहे.

जेपी नड्डा यांना 2014 ते 2019 या काळात पंतप्रधान मोदींच्या पहिल्या मंत्रिमंडळात आरोग्यमंत्री बनवण्यात आले होते. 2020 मध्ये, त्यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि पक्षाचे मुख्य रणनीतिकार अमित शहा यांच्या जागी भाजपचे अध्यक्षपद स्वीकारले. पक्षाध्यक्षाचा कार्यकाळ सप्टेंबर 2022 मध्ये संपण्यापूर्वीच नड्डा यांना 2024 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्यांदा घेतली शपथ, राष्ट्रपती भवनात पार पडला सोहळा

Modi’s Cabinet : महाराष्ट्रातील 6 खासदारांना मंत्रिपदासाठी फोन; जाणून घ्या कुणाला मिळणार संधी?

Murlidhar Mohol : नगरसेवक, महापौर ते थेट केंद्रात मंत्री! मुरलीधर मोहोळांना लॉटरी!