अखेर राज ठाकरे यांचा बहुचर्चित अयोध्या दौरा स्थगित

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ५ जून रोजीचा नियोजित अयोध्या दौरा स्थगित केला आहे. राज ठाकरे 5 जूनला अध्योध्येला जाणार होते. मात्र, आरोग्यासंदर्भातील समस्यांमुळे राज यांचा हा बहुचर्चित दौरा पुढे ढकलला आहे.

 

राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या अयोध्या दौऱ्यावरुन आता राजकारण चांगलंच तापले होते. राज ठाकरे यांच्या दौऱ्याला उत्तरप्रदेशचे भाजप खासदार बृजभूषण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांनी जोरदार विरोध केला होता. राज ठाकरे यांनी आधी उत्तर भारतीयांची माफी मागावी त्यानंतरच अयोध्येत पाय ठेवावा अशी भूमिका बृजभूषण सिंह यांनी घेतली आहे.