राज्यातील १६ शहराचं वीजवितरण खाजगी कंपन्यांकडे ; माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले…

मुंबई : मागील काही वर्षापासून वीजवितरणबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले होते. राज्यात अनेक ठिकाणी वीजबिल भरले नाहीत म्हणून शेतकऱ्यांचा वीजपुरवठा देखील खंडित करण्यात आला आहे. अशातच आता राज्यातील प्रमुख १६ शहारांतील वीजवितरण खासगी कंपन्यांकडे देण्याचा राज्य सरकारचा विचार सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात महत्वाची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

सरकारने जर यासंदर्भात निर्णय घेतला तर तो निर्णय अत्यंत वाईट आणि चूकीचा ठरणार आहे. कारण याबाबत केंद्र सरकारच्या विद्युत कायद्यांमध्ये १५ टक्क्यांपर्यंत तोटा हा मान्य करण्यात आला आहे. तसं पाहिलं तर महाराष्ट्रात एक दोन शहरं सोडली तर विद्युत कंपन्या मध्ये जास्त काही तोटा झालेला दिसून येत नाही. वीज वितरण खासगी कंपन्याकडे देण्याची सध्या तरी गरज वाटत नसल्याची प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्रात कोणत्याही शहरातील वीजविरणामधील तोटा हा पुन्हा भरून जाऊ शकतो. यासाठी कर्मचाऱ्यांची भूमिका महत्वाची ठरेल. शेतकऱ्यांना वीज दिल्यानंतर ती कंपनी कधीही डुबत नाही. शेतकऱ्यांना वीज देणे म्हणजे महाराष्ट्राची जीडीपी वाढवणे आहे. तसेच दुष्काळाची परीस्थिती असताना वीजकापणी करू नये.

शरद पवार यांनी स्वत: नागरपुर येथे हल्लाबोल कार्यक्रमात शिक्षण शेतकऱ्यांची वीजकापणी करू नका, असं सांगितलं होतं. तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानमंडळात शेतकऱ्यांची वीजतोडणी करणार नसल्याची घोषणा केली होती. तेव्हा शेतकऱ्यांनामुळे वीजवितरण डुबतं. शेतकऱ्यांनामुळे खासगीकरण करावं लागतं. मी या मताचा नाही आहे, असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.