‘इमर्जन्सी’मधील कंगना राणौतची पहिली झलक, इंदिरा गांधींच्या लूकला प्रेक्षकांची पसंती 

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut)तिच्या नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. पडद्यावर झाशीची राणी थलैवी जयललिता यांची दमदार भूमिका साकारल्यानंतर कंगना राणौतने पुन्हा तिच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. कंगना राणौत आता माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या देशातील सर्वात शक्तिशाली महिलेची भूमिका साकारणार आहे.

सिनेमाचं नाव आहे इमर्जन्सी(Emergency). ज्याचे शूटिंग कंगना राणौतने सुरू केले आहे. यासोबतच कंगनाने चाहत्यांना ट्रीट देत चित्रपटातील तिचा फर्स्ट लूक उघड केला आहे. चित्रपटाचा एक टीझर व्हिडिओ देखील शेअर करण्यात आला आहे, ज्यात कंगना राणौतचा इंदिरा गांधीच्या भूमिकेत फर्स्ट लूक आहे. टीझरमध्ये इंदिरा गांधी बनलेल्या कंगना राणौत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना त्यांच्या कार्यालयात मॅडम नव्हे तर ‘सर’ म्हणतात असा संदेश देण्यास सांगते. कंगनाच्या लूकपासून ते तिच्या आवाजापर्यंत इंदिरा गांधींशी बरोबरी साधण्याचा खूप प्रयत्न करण्यात आला आहे.

कंगना राणौतने इंदिरा गांधींची भूमिका चोखपणे साकारली आहे. यात कंगना रणौत हुबेहुब इंदिरा गांधींसारखी दिसते. कंगनाच्या लूकवर अतिशय बारकाईने काम करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. कंगना रणौताच्या लूकची सोशल मीडियावर जोरदार प्रशंसा होत आहे. इंदिरा गांधींच्या लूकमध्ये कंगना चाहत्यांना खूप आवडत आहे. या चित्रपटामुळे कंगना पुन्हा एकदा राष्ट्रीय पुरस्कार जिंकणार असल्याचे युजर्सचे म्हणणे आहे. लोक कंगनाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणत आहेत.