उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री शिंदे यांचा आणखी एक झटका देण्याच्या तयारीत

मुंबई – विधानसभेत दोन तृतीयांश आमदारांचा गट जमवून महाविकास आघाडी(Mahavikas Aghadi) सरकार उलथवून देणारे एकनाथ शिंदे आता शिवसेनेला दुसरा हादरा देण्याच्या तयारीत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची शिवसेनेच्या खासदारांसोबत नुकतीच एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीनंतर शिवसेनेचे खासदार शिंदेगटात शामिल होण्याच्या तयारीत आहेत.

शिवसेना (Shiv Sena)खासदारांची एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. काल रात्री मुख्यमंत्री निवासस्थानी बैठक झाल्याचे समोर आले आहे. आमदारांप्रमाणेच शिंदे गट दोन तृतीयांश खासदारांचा गट तयार करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आमदार, नगरसेवकांनंतर उद्धव ठाकरेंना शिंदे आणखी एक झटका देण्याच्या तयारीत आहेत.

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची संघटनेवर घट्ट पकड असल्याचं बोललं जात होतं. मात्र पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि थेट ठाकरे कुटुंबालाच आव्हान दिलं. शिंदे यांनी शिवसेनेचे दोन तृतीयांशपेक्षा अधिक आमदार आपल्या गटात आणत ताकद दाखवून दिली. तसंच आमची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचं शिंदे गटाकडून सांगितलं जात आहे.