Karnataka : JDS कार्यकर्त्यांनी भाजप समर्थकांवर चाकूने हल्ला केला, हाणामारीत अनेक जखमी

Karnataka Election 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन राजकीय पक्षांमध्ये हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. राज्यातील तुमाकुरू येथे भाजप आणि जेडीएस कार्यकर्त्यांमध्ये रक्तरंजित चकमक झाली. ज्यामध्ये अनेक लोक जखमी झाले आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार, जेडीएस कार्यकर्त्यांनी भाजप समर्थकांवर तुटलेल्या बाटल्या आणि चाकूने हल्ला केल्याचा आरोप स्थानिक दुकानदारांनी केला. याप्रकरणी तुमकूर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एबीपीने याबाबत वृत्त दिले आहे.
भाजपचे दोन कार्यकर्ते जखमी

भाजपच्या एका कार्यकर्त्याने सांगितले की, ‘मुबारक पाशा आणि नजीर असे दोन भाजप कार्यकर्ते जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जेडीएस कार्यकर्त्यांनी हल्ला केला. पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, तुमकुरू येथे शनिवारी सकाळी भाजप आणि जेडीएस कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या संघर्षात हे कार्यकर्ते जखमी झाले. जेडीएस कार्यकर्त्यांनी भाजपच्या लोकांवर जीवघेणा हल्ला केल्याचे स्थानिक दुकानदारांचे म्हणणे आहे. याप्रकरणी तुमकूर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, गेल्या महिन्याच्या सुरुवातीला, बेंगळुरूच्या गोविंदराजनगर मतदारसंघातील एका मैदानावर काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या संघर्षानंतर कर्नाटक पोलिसांनी एफआयआर नोंदवला होता. 19 मार्च रोजी होणाऱ्या महिला परिषदेसाठी नेत्यांचे बॅनर आणि पोस्टर लावणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना भाजप समर्थकांनी विरोध केला, त्यानंतर हाणामारी झाली.