लाखो तरुणांच्या हृदयाची धडकन आहे सनरायझर्सची मालकीण काव्या मारन, सांभाळते मोठा बिझनेस

Who Is Kavya Maran: इंडियन प्रीमियर लीग २०२३ मध्ये सनरायझर्स हैदराबादचा संघ विशेष कामगिरी करताना दिसत नाहीये. हैदराबाद संघाने आतापर्यंत ६ सामने खेळताना केवळ २ सामन्यात विजय मिळवला आहे. तर त्याच्या दुप्पट अर्थातच ४ सामने संघाने गमावले आहेत. जरी हैदराबाद संघाचे खेळाडू त्यांच्या प्रदर्शनाने चाहत्यांना खूश करण्यात अपयशी ठरताना दिसत असले तरीही हैदराबाद संघाची मालकीण काव्या मारन (Kavya Maran) हिला दरवेळी स्टेडियममध्ये पाहून चाहत्यांची मात्र कळी खुलते.

हैदराबाद संघाच्या एखाद्या खेळाडूने षटकार मारला किंवा कोणी जबरदस्त झेल टिपला तर काव्याचा आनंद गगनात मावेनासा होतो. अगदी कॅमेरामनही काव्याच्या चेहऱ्यावरील आनंद कॅमेरात टिपण्यात क्षणाचाही विलंब करत नाही. काव्याच्या याच हास्यावर लाखो क्रिकेटप्रेमी घायाळ होतात. काव्या नेमकी कोण आहे, तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अधिक जाणून घेण्याची उत्सुकता नेहमीच क्रिकेटरसिंकांना असते.

कोण आहे काव्या मारन?
काव्या खूप सुंदर आहे आणि सोशल मीडियावर तिची फॅन फॉलोइंग खूप जास्त आहे. काव्या मारन (Kaviya Maran) ही सन ग्रुपच्या मालक कलानिती मारन (Kalanithi Maran) यांची मुलगी आहे. सनरायझर्स हैदराबाद (SRH) हा त्याचा संघ आहे. काव्या मारन ही कलानिधी मारन यांची मुलगी आणि माजी केंद्रीय मंत्री दयानिधी मारन (Dayanidhi Maran) यांची भाची आहे.

30 वर्षीय काव्या मारन स्वतः सन म्युझिकशी संबंधित आहे. ती पहिल्यांदा टीव्हीवर आयपीएल 2018 मध्ये तिच्या टीम हैदराबादला चीअर करताना दिसली. काव्या मारन सनरायझर्स हैदराबाद (SRH) ची सीईओ आहे. एमबीए पूर्ण केल्यानंतर, काव्याने तिचे वडील कलानिती मारन यांच्या व्यवसायात सामील होण्याचा निर्णय घेतला. काव्याने तिच्या कंपनीत मोठ्या पदावर जाण्यापूर्वी अनुभव मिळविण्यासाठी सन टीव्ही नेटवर्कमध्ये इंटर्नशिपही केली. काव्या सध्या सन टीव्ही नेटवर्कच्या ओटीटी प्लॅटफॉर्म सन नेक्स्ट सन एनएक्सटीची प्रमुख आहे.