एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात भाजपाला २५ मंत्रीपदे? शिंदे गटाच्या वाट्याला किती?

मुंबई : शिंदे सरकारनं विश्वासदर्शक ठराव 164 विरुद्ध 99 अशा फरकाने जिंकल्यानंतर  एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपदी (Deputy CM Devendra Fadnavis) विराजमान झाले आहेत. दरम्यान, आता सर्वांचे लक्ष मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात 38 मंत्री असण्याची शक्यता आहे, त्यापैकी बहुतांश भाजपचे मंत्री असणार आहेत. नव्या मंत्रिमंडळात भाजपचे (BJP) 25, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 13 मंत्री असतील, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

मुख्यमंत्री आणि त्यांचे उपमुख्यमंत्री (Deputy CM )देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय बहुतांश मंत्री नवीन असतील. पुढील महाराष्ट्र निवडणुकीपूर्वी भाजपला नव्या चेहऱ्यांची चाचपणी करायची असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. शिवसेनेत (Shiv Sena) सत्तापालट केल्यानंतर 48 वर्षीय एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद स्वीकारले. बंडखोरीनंतर पूर्वीचे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार पडले.

‘शिंदे सेना’ (Shinde Sena)आणि भाजपमध्ये फॉर्म्युला निश्चित होत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेला प्रत्येक तीन आमदारांमागे एक आणि भाजपला प्रत्येक चार आमदारांमागे एक मंत्रीपद मिळणार आहे. 11 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या (MLA)संभाव्य अपात्रतेबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.