तुम्ही ज्या जागा जिंकू शकणार नाहीत, त्याच मविआ तुम्हाला देत आहे- Nitesh Rane

Prakash Ambedkar: देशभरात सर्वच पक्षांकडून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेतृत्वाखाली विरोधकांची निवडणूक लढवण्याची तयारी सुरू आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात जागावाटपाची चर्चा सुरू आहे. नुकतेच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनाही महाविकास आघाडीत येण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. दरम्यान प्रकाश आंबेडकर यांची महाविकास आघाडी फसगत करीत असल्याचे भाजपचे आमदार नितेश राणे (mla nitesh rane) यांनी म्हटले.

आमदार नितेश राणे म्हणाले प्रकाश आंबेडकर ज्या जागा जिंकणार नाहीत त्याच जागा त्यांना देण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी करत आहे. आंबेडकर नावासाठी प्रकाशजींनी योग्य निर्णय घ्यावा असे राणेंनी नमूद केले. ते म्हणाले डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुटुंबियांचा अपमान महाविकास आघाडीचे नेते करीत आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी स्वाभिमानासाठी याेग्य वेळी याेग्य निर्णय घ्यावा.

महत्वाच्या बातम्या-

Congress | कॉंग्रेसला सर्वात मोठा धक्का; माजी मुख्यमंत्र्याच्या कन्येने केला भाजपमध्ये प्रवेश

Congress | ‘महंगाई डायन’ म्हणणाऱ्या भाजपाला आता तीच ‘महंगाई डार्लिंग’ वाटू लागली आहे का? काँग्रेसचा सवाल

तुम्हाला सन्मानाचं पद देऊ,ठाकरेंनी नितीन गडकरींना ऑफर दिल्यानंतर आता सुधीर मुनगंटीवारांची ठाकरेंना ऑफर