बाळासाहेबांच्या विचारांना शिवसेना पक्षप्रमुखांकडूनच तिलांजली; मुंबई जिंकण्यासाठी सुरू केले लुंगीवाल्यांचे लांगुलचालन

उद्धवसाहेब मुंबई जिंकण्यासाठी लुंगीवाल्याच्या मांडीला मांडी लावून बसताना बाळासाहेबांची आठवण नाही आली का ?

मुंबई : भूमीपुत्राचा आवाज म्हणून शिवसेनेचा जन्म झाला. आणि बाळासाहेब ठाकरे प्रत्येक मराठी माणसाच्या गळ्यातील ताईत बनले. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर मुंबई महाराष्ट्रात राहिली असली तरी मुंबईची नाळ ही महाराष्ट्रापासून वेगळी होत होती. मराठी लोकांच्यासोबतच गुजराती आणि अन्य भाषिकांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत होती. मुंबईत अनेक उद्योगही उदयास आले असले तरी त्या उद्योगांच्या चाव्या मात्र अमराठी लोकांच्याच हाती होता. मराठी माणसाला दुय्यम स्थान मिळतंय अशी भावनाही त्या काळी जोर धरू लागली होती.

व्यापारातही गुजराती, मारवाडी आणि दाक्षिणात्य लोकांना प्राधान्य मिळत असल्यानं मराठी लोकांवर अन्याय होत असल्याच्या भावनेतून शिवसेनेनं जन्म घेतला. आपल्या व्यंगचित्रांमधून व्यक्त होणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि ‘मार्मिक’च्या माध्यमातून मराठीच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यास सुरूवात केली. त्यानंतर मराठी माणसाला संस्थात्मक पातळीवर एकत्र आणण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी १ जून १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना केली.

मराठी माणसांना पाठिंबा देण्यासाठी दाक्षिणात्य लोकांविरोधात हटाव लुंगी, बजाव पुंगी ही मोहीम शिवसेनेने सुरू केली. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हे त्या काळच्या शिवसेनेचे समिकरण होतं. आताच्या भूमिकेबाबत विचार न केलेलाच बरा. मराठी माणसाला शिवसेना आपलीशी वाटल्यानंच मराठी माणूसही शिवसेनेशी जोडला गेला आणि राज्यभर त्यांचा वेगाने विस्तारही झाला. ‘मुंबई आमची, नाही कुणाच्या बापाची’ हे समोरच्या ठणकावून सांगण्याची हिंमतही मराठी माणसाला बाळासाहेबांच्या शिवसेनेनेच दिली.

पण बाळासाहेबांनी सुरु केलेली ही आक्रमक आणि मराठी माणसाच्या हक्काची चळवळ आता एका नव्या वळणावर येऊन थांबलीय. वरळीत बाळासाहेबांचे नातू आणि ठाकरेंची तिसरी पिढी अर्थात आदित्य ठाकरेंना लुंगी घालून प्रचार करताना संबंध महाराष्ट्रनी पाहिलं. त्यांच्या वरळी मतदारसंघातील दाक्षिणात्य मतदार आदित्यसाहेबांच्या या स्टंटने भारावून गेला असेल खरे पण ज्या मराठी माणसाच्या काळजात बाळासाहेब आणि त्यांची ‘हटाव लुंगी, बजाव पुंगी’ ही अजरामर घोषणा आजही जिवंत आहेत त्याचं काय ?

आदित्य ठाकरे यांच्या लुंगी प्रचाराची कमी होती की काय आता शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट लुंगीवाल्याला मुंबईत आमंत्रित करून मांडीला मांडी लावून बड्या बड्या गप्पा झाडल्या. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव मुंबईत आले आणि वर्षावर येऊन म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून मिळालेल्या प्रेरणेवरच आम्ही चालत आहोत. महाराष्ट्र आणि तेलंगणा भाऊ-भाऊ आहेत. दोन्ही राज्यांमध्ये हजार किलोमीटरचे अंतर असले तरी दोन्ही राज्यात चांगले संबंध आहेत.’ प्रश्न देशात भाजपला पर्याय उभा करण्याचा असला तरी मुंबई महापालिकेच्या तोंडावर दाक्षिणात्य मतदारांना आकर्षित करण्याची सेनेची ही खेळी तर नाही ना ? असा प्रश्न उपस्थित होणे साहजिक आहेच.

पण ज्या मराठी माणसासाठी ज्या मुंबईसाठी बाळासाहेबांनी लढा उभा केला त्या मुंबईवर विजय मिळवण्यासाठी शिवसेनेचा मराठी माणसावर विश्वास नाही राहिला का ? की जेणेकरून त्यांना यासाठी दाक्षिणात्य लुंगीवाल्यांच्या मांडीला मांडीला मांडी लावून बसण्याची वेळ आलीय हा खरा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न पडलाय बाळासाहेबांच्या त्या शिवसैनिकाला ज्याने जीवाची बाजी लावून मुंबई गुजराती आणि उडप्याच्या घशात जाताना वाचवलीय आशा आहे शिवसैनिकांचे लाडके उद्धवसाहेबच आता आपल्या लढाऊ शिवसैनिकांना खरं उत्तर देतील.