मनोहर पर्रीकर आणि फ्रान्सिस डिसूजा यांची जोडी राम लक्ष्मणासारखी होती – फडणवीस

म्हापसा – भारतीय जनता पक्षाचे म्हापसा मतदार संघातील उमेदवार जोशुआ डिसुझा यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे आज उद्घाटन गोवा भाजपा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी बोलताना फडणवीस यांनी जोशुआ डिसुझा यांचे वडील फ्रान्सिस डिसुझा आणि माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. भाजपच्या वाटचालीत मनोहर पर्रीकर आणि फ्रान्सिस डिसूजा यांची जोडी राम लक्ष्मणा सारखी होती असं फडणवीस म्हणाले.

या कार्यक्रमाला, गोवा भाजपा प्रभारी देवेंद्र फडणवीस, म्हापसा मतदार संघातील उमेदवार जोशुआ डिसुझा, देशाध्यक्ष सदानंद तानावडे, भोसरीचे आमदार महेश लांडगे, आमदार राम सातपुते, माजी मंत्री दयानंद मांजरेकर, भाजप नेते अभिजित सामंत, नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर, मंडळ अध्यक्ष सुशांत हरमलकर यांच्यासह भाजप आणि भाजयुमोचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, आज या उद्घाटनाच्या निमित्ताने आम्ही मनोहर पर्रीकर आणि फ्रान्सिस डिसुझा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले .भाजपच्या वाटचालीत मनोहर पर्रीकर आणि फ्रान्सिस डिसूजा यांची जोडी राम लक्ष्मणा सारखी होती. या दोघांनी अतिशय चांगलं काम या ठिकाणी केलं मनोहर भाईंच्या खांद्याला खांदा लावून फ्रान्सिस डिसुझा काम करायचे आणि या संपूर्ण प्रदेशाचे विकसनशील परिवर्तन त्यांच्याच काळात झालं आणि म्हणूनच म्हापसेकरांनी त्यांच्यावर सातत्याने प्रेम केलं. भारतीय जनता पक्षावर वर प्रेम केलं आणि सर्व निवडणुकांमध्ये भाजपला सातत्याने मतदारांचा आशीर्वाद लाभला.

दरम्यान, पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, जोशुआ सारखा एक अतिशय नेता या मतदार संघाला लाभला ज्याने पोटनिवडणुकीत विजय मिळवला. अतिशय छोटा कार्यकाळ त्यांना मिळाला पण या कार्यकाळात देखील त्यांनी उत्तम काम करण्याचा प्रयत्न केला. मला विश्वास आहे जी परंपरा बाबुश यांनी सुरू केली ती परंपरा पुढे नेण्याचे काम जोशुआ निश्चितपणे करतील असं देखील फडणवीस म्हणाले.