‘प्रियंका गांधी यांनी दिलेल्या लडकी हूं, लड सकती हूं या नाऱ्यामुळे महिलांना उर्जा मिळाली’

पुणे : ‘‘लडकी हूं लड सकती हूं’’ या मोहिमेस १२५ दिवस पूर्ण झाल्याबद्दल पुणे शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने आज गोपाळकृष्ण गोखले चौक (गुडलक चौक) येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी दिलेला नारा ‘लडकी हूं लड सकती हूं, मुलींची शक्ती’ मुलींचा सन्मान, आपल्या पूर्ण भारत देशातील मुली आणि स्त्रिया आपल्या अधिकारासाठी लढू शकतात हा संदेश ह्या घोषणेतून त्यांनी दिला आहे. यावेळी महिला आणि मुली गुलाबी टी शर्ट, गुलाबी साडी परिधान करून सभेत सहभागी झाल्या होत्या.

यावेळी महाराष्ट्राच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या की, ‘‘या समाजाला, या संसाराला जर कोणी घडवत असेल तर ती आपली महिला असते. महिला धोरण प्रथम महाराष्ट्रात काँग्रेस सरकारने अमलात आणले. प्रियंका गांधी यांनी ‘लडकी हूं, लड सकती हूं’ दिलेल्या या नाऱ्यातून आम्हाला उर्जा आलेली आहे आणि अन्यायाच्या विरूध्द लढण्यासाठी आम्ही महिला रस्त्यावर उतरणार आहोत. प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेश निवडणुकीत ४०% महिलांना उमेदवारी दिली. या निर्णयामुळे त्या राज्यात महिलांना समाजात पुढे येण्याची संधी मिळाली आहे. उत्तर प्रदेशमध्ये महिलांवर अन्याय होत असताना तेथील योगी सरकारने बघ्याची भूमिका घेतली. या निवडणुकीत उत्तर प्रदेशमधील महिला आपली स्त्री शक्ती दाखवून देणार आहेत. महाराष्ट्र सरकार आपले नविन महिला धोरण ८ मार्च महिला दिनाच्या दिवशी जाहिर करणार आहे.’’

यानंतर महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षा संध्या सव्वालाखे म्हणाल्या की, ‘‘आमच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी ‘लडकी हूं, लड सकती हूं’ हा नारा देवून महिलांना नवसंजीवनी दिली आहे. देशाचे भवितव्य जर कोणी बदलू शकत असेल तर ते फक्त महिलाच बदलू शकते. देशाचा सन्मान होण्यासाठी नारीशक्ती शिवाय पर्याय नाही.’’

पुणे शहर महिला काँग्रेस अध्यक्ष पूजा आनंद म्हणाल्या, ‘‘प्रियंका गांधी यांनी महिलांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी ‘लडकी हूं, लड सकती हूं’ हा नारा दिलेला आहे. आज या मोहिमेस १२५ दिवस पूर्ण होत आहे. काँग्रेस पक्षाने सत्तेत असताना महिला सक्षमीकरणासाठी अनेक धाडसी पाऊले उचलली. या ठिकाणी महाराष्ट्राचे महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी सुध्दा महाराष्ट्रात महिलांच्या हितासाठी अनेक योजना राबविल्या आहेत. प्रियंका गांधी यांनी दिलेल्या नाऱ्याची प्रेरणा घेवून आपण सर्वांनी महिलांच्या हितासाठी आणि संरक्षणासाठी कटीबद्ध राहिले पाहिजे.’’

यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे, आमदार संग्राम थोपटे, कमल व्यवहारे, दीप्ती चवधारी, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा संगीता तिवारी, नीता रजपूत, नगरसेविका लता राजगुरू, वैशाली मराठे, मनीष आनंद, सीमा सावंत, इंदिरा अहिरे, स्वाती शिंदे, सुनिता चिंता, शर्वरी गोतारणे, ज्योती अरवेल, वैशाली सातपूत, पूनम पाटील, सुनिता नेमुर, नंदा ढावरे, सीमा महाडिक, अंजली सोलापूरे, रसिका घोरपडे, संगीता धोंडे, निता त्रिवेदी, रुपाली कापसे, डॉ. अंजली ठाकरे, जयश्री वानखेडे, सूर्यशिला मोरे, नाढेताई, काळभोरताई ह्या महारष्ट्र प्रदेश पदाधिकारी उपस्थित होत्या.