विजय वडेट्टीवार यांच्याकडून छत्रपती शिवरायांचा अपमान, नवा वाद उफळणार ?

मुंबई : मंत्री विजय वड्डेटीवार (Vijay Vadettiwar) यांनी एका कार्यक्रमा दरम्यान चंद्रपुर राजूरा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी महाराजांच्या पुतळ्याच्या भागावरच पाय ठेवला आणि यावरूनच आता नवा वाद सुरु झाला आहे.

भाजप नेते केशव उपाध्ये यांनी या संबंधीचा व्होडीओ ट्विट करत विजय वड्डेटीवार यांचावर निशाणा साधला आहे. ‘महाआघाडी सरकारमधील मंत्री यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान. चंद्रपुर राजूरा येथे पुतळ्यावर हार घालण्यासाठी पुतळ्याचा भागावरच पाय ठेवा आता त्यांच्यावर काय ॲक्शन घेणार वडेवट्टीवारांवर की सत्तेसाठी दुर्लक्ष करणार? का असा सवालही त्यांनी सरकारला विचारला आहे.

दरम्यान, महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान होणे अत्यंत शरमेची बाब आहे. नुकतेच कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती. त्यावरून देशभरातून संतापाची लाट उसळली होती. आता त्यानंतर विजय वड्डेटीवार यांच्यावर झालेल्या आरोपांवरून नवा वाद सुरु झाला आहे.