पहिल्या टी- २० सामन्यासाठी ‘या’ युवा खेळांडूना मिळणार संधी ?

मुंबई : वेस्ट इंडीजला एकदिवसीय मालिकेत चितपट केल्यानंतर आज भारतीय संघ टी-२० सामन्यात देखील वेस्ट इंडीज संघावर वर्चस्व मिळवण्यासाठी मैदानात उतरणार आहे. टी -२० संघाचा उपकर्णधार के.एल.राहुल दुखापतीमुळे संघाबाहेर गेला आहे. त्यामुळे रोहित शर्मासोबत सलामीला कोण येणार याकडे चाहत्याचं लक्ष लागून आहे. ३ सामन्यांच्या या मालिकेला आज कोलकाता येथील ईडन गार्डनच्या मैदानावर सुरुवात होत आहे.

आँस्टेलिया येथे होणाऱ्या आगामी आंतरराष्ट्रीय टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी वेस्ट इंडीज विरूद्धची मालिका रंगीत तालीम मानली जात आहे. त्यामुळे या मालिकेत अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. राहुलच्या अनुपस्थित रोहित शर्मा सोबत सलामीला अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यात मागील आयपीएलच्या हंगामातील ‘आँरेंज कप’ विजेचा ऋतुराज गायकवाड, व्यंकटेश अय्यर, इशान किशान या खेळांडूचा समावेश आहे. तर विराट कोहली सुद्धा डावाची सुरुवात करण्याची शक्यता आहे.

भारतीय वेगवान गोलंदाजीची मदार ही दिपक चहर, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार यांच्या वर अवलंबून आहे. तर हर्षल पटेल, आवेश खान यांनाही या मालिकेत पहिल्या अकरामध्ये खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. तर युवा फिरकीपटू रवी बिश्नोई आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात पदार्पण करण्यासाठी उत्सुक आहे. त्याचबरोबर रिषभ पंत, सुर्यकुमार यादव, आणि दिपक हुड्डा यांच्या कामगिरीवर देखील विशेष लक्ष असणार आहे.

टी-२० सामन्यासाठी भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, युझवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, अवेश खान, हर्षल पटेल, ऋतुराज गायकवाड, दीपक हुड्डा.