महाविजय २०२४ : उत्तर महाराष्ट्र विभागीय सोशल मीडिया प्रमुखपदी प्रविण अलई यांची निवड

Pravin Alai :- भारतीय जनता पक्षाच्या (BJP) महाविजय २०२४उत्तर महाराष्ट्र विभागीय सोशल मीडिया प्रमुखपदी प्रदेश प्रवक्ते प्रविण अलई यांची निवड करण्यात आली आहे. भाजपाच्या महाविजय २०२४ चे संयोजक श्रीकांत भारतीय (Shrikant Bhartiy) यांनी अलई यांना नियुक्तीचे पत्र  नुकतेच दिले आहे. अलई यांनी आजतागायत भाजपात अनेक महत्वपूर्ण पदांवर काम केले असल्याने कामाचा अनुभव व त्यांच्या कार्यपध्दतीमुळे त्यांच्यावर सोशल मीडियाच्या उत्तर महाराष्ट्र लोकसभा विभाग प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला एकहाती विजय मिळवून देण्यासाठी भाजपकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढविण्याची तयारी सुरू करण्यात आली असून या तयारीला मिशन महाविजय २०२४ असे नाव देण्यात आले आहे. सोशल मीडियाचा वापर आणि प्रचारासाठीचे सहज-सुलभ माध्यम असल्याने सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर व्हावा या हेतूने

राज्यातल्या २८८ विधानसभा आणि ४८ लोकसभा मतदारसंघात वॉर रूम उभारण्यात येणार असून त्या माध्यमातून प्रत्येक उमेदवारावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसेच मोदी सरकार आणि राज्य सरकारची कामेही लोकांपर्यत पोहोचवण्यात येणार आहेत.

त्याअनुषंगाने दोन्ही निवडणुकात प्रभावीपणे काम करून भाजपच्या विजयाचा शंखनाद करणार असल्याचा विश्वास अलई यांनी व्यक्त केला.तसेच त्यांनी महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस,प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महविजय २०२४ अभियान प्रमुख  आमदार श्रीकांत भारतीय यांचे आभार मानून आपल्यावर त्यांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवू  असे म्हटले आहे.

अलई यांच्या निवडीचे नामदार गिरीष महाजन , केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री नामदार भारती पवार , नामदार डॉ विजयकुमार गावित, सरचिटणीस व उत्तर महाराष्ट्र प्रभारी  विजय चौधरी,प्रदेश उपाध्यक्ष व नाशिक प्रभारी राजेंद्र कुमार गावित, खासदार उन्मेष पाटील, खासदार हीना गावित, खासदार रक्षा खडसे, खासदार डॉ सुभाष भामरे, खासदार सुजय विखे पाटील, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रदेश उपाध्यक्ष (मुख्यालय) माधव भंडारी, प्रदेश सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण,प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन , आमदार जयकुमार रावल, आमदार राम शिंदे,आमदार डॉ राहुल आहेर, आमदार देवयानी फरांदे,आमदार सीमाताई हिरे, आमदार राहुल ढिकले, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी,प्रदेश प्रवक्ते गोविंद बोरसे, प्रदेश प्रवक्ते प्रदीप पेशकर, , नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव, नाशिक दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, नाशिक उत्तर ग्रामीण जिल्हाध्यक्ष शंकर वाघ आदी सह उत्तर महाराष्ट्रातील सर्व मंत्री आमदार खासदार जिल्हा अध्यक्ष व लोकप्रतिनिधी, प्रदेश पदाधिकाऱ्यांनी त्यांचे  अभिनंदन केले आहे.

महत्वाच्या बातम्या-

उद्योग वाढीसाठी चंद्रपूर येथील मोरवा विमानतळाची धावपट्टी विकसित करा- आ. किशोर जोरगेवार

ठग सुकेशला अयोध्या मंदिरात दान करायचा आहे 11 किलो सोन्याचा मुकुट, तुरुंगातून लिहिलेले पत्र

न्यूझीलंडविरुद्धच्या विजयानंतर पाकिस्तान सेमीफायनलमध्ये पोहोचणार का? जाणून घ्या समीकरण