Chandrakant Handore | विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा खरा वारसदार मीच

Chandrakant Handore |अकोला लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार डॉ. अभय पाटील यांचा अर्ज आज दाखल करण्यात आला. अर्ज दाखल करण्याआधी झालेल्या सभेत बोलताना खासदार चंद्रकांत हंडोरे म्हणाले की, निवडणुकीच्या तोंडावर जाती धर्माच्या नावाखाली भाजपा समाजात भांडणे लावत आहे. देशाचे स्वातंत्र, लोकशाही व संविधान धुळीस मिळवत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान संपवण्याचा भाजपाचा डाव आहे, हा डाव हाणून पाडा.

काँग्रेसने सर्वांना समान अधिकार देण्याचे काम केले. सोनिया गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली युपीए सरकारने गरिबांसाठी अन्न सुरक्षा कायदा आणला, माहितीचा अधिकार कायदा आणला, मनरेगा योजना आणली. काँग्रेस पक्षच दलित, आदिवासी, अल्पसंख्याक समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे. आपल्याला आमदार, खासदार मंत्री केले. मंत्री असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने राज्यभर न्याय भवन उभे केले. रमाई आवास योजना आणली. दलित, गरिब समाजाच्या कल्याणासाठी काम केले. खऱ्या अर्थाने मीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा वारसदार आहे, असेही चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore) म्हणाले.

डॉ. अभय पाटील यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करताना काँग्रेस प्रदेध्यक्ष नाना पटोले, खासदार चंद्रकांत हंडोरे, जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर, आ. अमित झनक, आ. नितीन देशमुख, माजी आमदार गुलाबराव गावंडे, हेमंत देशमुख, उद्धव ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, राष्ट्रवादीचे संग्राम गावंडे, ॲड.परवेज डोकाडिया, कपिल रावदेव आदी पदाधिकारी उपस्थित होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | आम्हाला पडणारं मतदान निश्चित आहे; मोहोळांबाबत धीरज घाटेंनी व्यक्त केला विश्वास

Shirur LokSabha 2024 | शिरूर लोकसभा मतदारसंघात कुणाचे पारडे जड? राजकीय गणितं काय ?

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाचे ‘बूथ विजय अभियान’, प्रत्येक बुथवर ३७० मते वाढविण्याचा निर्धार