किरण साळी यांची युवासेना राज्य सचिव पदी निवड; एकनाथ शिंदे यांनी केली नियुक्तीची घोषणा

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी पुणे शहर व जिल्हातील हजारो कार्यकर्ताच्या उपस्थीतीत मेळावा पार पडला. या मेळाव्यास एकनाथ शिंदे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिवसेनेमधील बंडाळी नंतर पुणे जिल्हा व शहर शिवसेनेला देखील मोठे खिंडार पडले आहे. यावेळी शिवसेना राष्ट्रीय कार्यकारणी समितीचे  माजी मंत्री उदय सामंत, विजय शिवतारे (Uday Samant, Vijay Shivatare) तसेच आमदार भरतशेठ गोगावले, संजय शिरसाठ,  प्रकाश सुर्वे, बालाजी कोनाक्री, रविंद्र फाटक (Bharatsheth Gogavle, Sanjay Shirasath, Prakash Surve, Balaji Conakry, Ravindra Phatak) यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या वेळी मेळाव्यात शिवसेनातील अनेक पदाधीकार्‍यांनी जाहीर समर्थन दिले.

यावेळी मुख्यमंत्री यांनी रमेश कोंडे यांची पुन्हा एकदा जिल्हाप्रमुख पदी, नाना भानगिरे यांची शहरप्रमुखपदी, अजय भोसले यांची जिल्हा व शहर सह-संपर्कप्रमुखपदी तर किरण साळी यांची युवासेना महाराष्ट्र राज्य सचिवपदी नियुक्ती करण्याचा निर्णय याप्रसंगी जाहीर केला.

यावेळी माजी आमदार विजय शिवतारे, आमदार भरतशेठ गोगावले, आमदार उदय सामंत, आमदार संजय शिरसाट, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार सदा सरवणकर, आमदार रवींद्र फाटक, आमदार डॉ.बालाजी किणीकर, ठाणे महानगरपालिका माजी महापौर नरेश म्हस्के, रमेश कोंडेश्वर, किरण साळी, नाना भानगिरे आणि पुणे जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते.

नियूक्ती जाहीर झाल्यानंतर मेळाव्यात बोलताना किरण साळी (Kiran Sali) म्हणाले,आजपर्यत  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंन्दुत्वादी विचारानुसार व शिकवणीनुसार पक्षात पंधरा वर्षे सक्रीय काम केले.संघर्ष करताना आनेक केसेस विविध आंदोलनामुळे माझ्यावर झाले.मात्र मी   डगमगलो नाही.सतत पक्षहित समोर ठेउन,पक्षबांधणीसाठी काम केले.मात्र कधीही व्यासपीठ उपल्बध झाले नाही.

आज मुख्यमंत्र्यांना ग्वाही देउ ईच्छितो,आपण द्याल ती जबाबदारी व सांगाल ते काम मी प्रमाणिकपणे करीन. आगामी काळात माझे मार्गदर्शक माजीमंत्री उदय सामंत साहेब आणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी अव्याहत कष्ट व संघर्ष करु.असं साळी म्हणाले.