एकनाथ शिंदे आणि त्याच्या गटाचे आमदार टोकाचं पाऊल उचलण्याच्या तयारीत ? 

मुंबई – विधान परिषदेच्या निकालाने महाविकास आघाडीला झटका बसला असून, शिवसेनेतील महत्त्वाचे नेते आणि सध्या कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे गुजरातमध्ये गेले आहेत. ते सध्या नॉट रिचेबल असून, सध्या ते सुरतमधील ली मेरिडिअन या हॉटेलमध्ये आहेत. एकनाथ शिंदे निकालानंतर सोमवारी रात्रीच गुजरातमध्ये गेले.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे 17 आमदारांसह सुरतमध्ये एका हॅाटेलमध्ये असल्याची चर्चा आहे.एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच १३ आमदार असल्याचीही माहिती आहे. त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे अचानक नॉट रिचेबल झाल्याने आता शिवसेनेतील नेत्यांची खदखद पुढे आली आहे.

गेले काही वर्ष नाराज असलेले शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि त्याच्या गटाचे आमदार यांनी टोकाचं पाऊल उचललं आहे अशी माहिती समोर येत आहे. एकनाथ शिंदे यांचा नाराज गट काल सायंकाळपासूनच नॉट रिचेबल असल्याची माहिती  आहे.