कोथरूडच्या वाघिणीचा धडाका; मटका अड्डा केला उध्वस्त, दबंग स्टाईलचे होतेय कौतुक

Medha Kulkarni – कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी (Former Kothrud MLA Medha Kulkarni) या आपल्या धडाकेबाज कार्यशैलीकरिता ओळखल्या जातात. कोथरूड तसेच शहरातील अवैध धंद्यांच्या विरोधात त्या नेहमीच आवाज बुलंद करत असतात. आज देखील त्यांनी एका मटक्याच्या अड्ड्यावर छापा टाकत हा अड्डा उधवस्त केला आहे.

कुलकर्णी यांनी पाषाणमधील एका मटका अड्ड्यावर पोलिसांसह छापा टाकला व कारवाई केली. या धाडसी छाप्याचे एका बाजूला कौतुक होत आहे तर दुसऱ्या बाजूला हा अड्डा चालवणाऱ्या लोकांवर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे

याआधी कोथरुडच्या आमदार असताना मेधाताईंनी कोथरुडमधल्या दारूअड्ड्यावर जाऊन तो बंद पाडला. तेव्हा, त्यांची मोठी चर्चा झाली होती. आता एकदम दबंग स्टाईलमध्ये जात त्यांनी पाषाणमधल्या मटक्याचा अड्डा बंद केला.

महत्वाच्या बातम्या-

चिंता करू नका ! तुमचा जन्म फौजदार होण्यासाठी झालाय; संघर्षमय कहाणीचा संघर्षयोद्धा पीएसआय रावसाहेब जाधव

माय होम इंडियाकडून राजमाता जिजाऊ गौरव व स्वामी विवेकानंद युवा पुरस्कारार्थी जाहीर

तेजस्विनी पंडित साकारणार ‘स्वराज्य कनिका – जिजाऊ’