स्वर्गीय निळू फुले यांची कन्या अभिनेत्री गार्गी फुले यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश

मुंबई – ज्येष्ठ सिने अभिनेते स्वर्गीय निळूभाऊ फुले (Nilu Phule) यांची कन्या अभिनेत्री गार्गी फुले (Gargi Phule), नृत्य दिग्दर्शक आशुतोष राठोड, निर्माते नितीन पवार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुनील तटकरे, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, सांस्कृतिक सेल प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला.

पवार यांनी देखील सर्वांना पुढील राजकीय वाटचालीसाठी यावेळी शुभेच्छा दिल्या. सांस्कृतिक सेल प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी गार्गी फुले यांना राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक सेलच्या प्रदेश उपाध्यक्ष, आशुतोष राठोड यांची पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष व नितीन पवार यांची पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी नियुक्ती केली. ही नियुक्ती पत्र अजितदादा पवार यांच्या हस्ते देण्यात आले.