जयपूरमधील एका हॉटेलच्या खोलीत अचानक घुसला बिबट्या, कॅमेऱ्यात कैद झाला बिबट्याचा थरार

Leopard enters staff room at heritage hotel in Jaipur: जयपूरमधील एका हॉटेलमध्ये एका खोलीत बिबट्या घुसल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना 18 जानेवारी रोजी घडल्याचे सांगण्यात येत आहे. बिबट्याला पाहिल्यानंतर हॉटेलमध्ये एकच गोंधळ उडाला. हॉटेल व्यवस्थापनाने याबाबत वनविभागाला माहिती दिली. वनविभागाचे अधिकारी येण्यापूर्वी हॉटेल व्यवस्थापनाच्या लोकांनी बिबट्याला खोलीत बंद केले. एका खोलीत बिबट्याने धिंगाणा केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. याचे कृत्य पाहून तुम्हालाही गलबलून येईल.

हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर सच कडवा है नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हॉटेलच्या खोलीत बंद असलेल्या बिबट्याने खोलीत एकच खळबळ उडवून दिल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. बिबट्याने खोलीतील सामान इकडे तिकडे विखुरले असून ते बघून भक्षाच्या शोधात असल्याचा भास होत आहे. काही लोक खिडकीच्या बाहेरून बिबट्याचा व्हिडीओ बनवत आहेत, बाहेर माणसं उभी आहेत हे बिबट्याला समजताच तो जोरात उडी मारून त्यांच्याकडे झेप घेतो, खोली बंद होती आणि त्याला पटकन समजते. तो शिकार करू शकत नाही.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, गुरुवारी, 18 जानेवारी रोजी सकाळी 9.40 च्या सुमारास एक बिबट्या हॉटेलमध्ये घुसला. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी तेथे उपस्थित पाहुण्यांना बाहेर काढले आणि वन अधिकाऱ्यांना बोलावले. बिबट्या एका खोलीत बंदिस्त होता. इन्स्टाग्रामवर दीड लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून कमेंट करून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

मंदिर नको तर रोटी, कपडा, मकान, शिक्षण आणि आरोग्य हवंय; नक्षलवाद्यांची कोल्हेकुई झाली सुरु

Ram Mandir Pran Pratishta : राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळा थांबवला जाणार?

Women’s Health: 50 व्या वर्षी निरोगी राहू इच्छिता? रोज ही एक गोष्ट खायला सुरुवात करा