‘मी लग्न करणार नाही, पण…’ रश्मिकासोबत लग्न करण्यावर अखेर विजय देवरकोंडाने सोडलं मौन

Vijay Deverkonda on wedding with Rashmika Mandhanna: काही काळापूर्वी रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्यात एंगेजमेंट झाल्याच्या अफवा पसरल्या होत्या. या वर्षी फेब्रुवारीमध्ये लव्हबर्ड्सची एंगेजमेंट होणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या, पण त्याला पुष्टी मिळाली नाही. याआधीही त्यांच्या डेटिंगच्या बातम्यांमुळे दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा रंगली होती. पण या सगळ्या दरम्यान, फेब्रुवारीमध्ये एंगेजमेंटच्या अफवांवर प्रतिक्रिया देताना विजय देवरकोंडाने स्पष्टीकरण दिले की साखरपुडा करणार नाहीत.

शिवाजी मानकर

वास्तविक, जेव्हा विजय देवराकोंडा आणि रश्मिका मंदान्ना मालदीवमध्ये एकत्र दिसले होते, तेव्हा त्यांच्या फेब्रुवारीमध्ये साखरपुड्याची अफवा वणव्यासारखी पसरली होती. तसेच ते लग्नही करणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. तर त्यांच्या डेटिंगच्या अफवाही बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होत्या. त्यानंतर या जोडप्याच्या जवळच्या सूत्राने ‘हिंदुस्तान टाइम्स’ला सांगितले की, ते त्यांच्या नात्याबद्दल उघडपणे बोलत नाहीत.

लाइफस्टाइल एशियाला दिलेल्या मुलाखतीत ‘अर्जुन रेड्डी’ अभिनेता विजय देवरकोंडा म्हणाला, ‘मी फेब्रुवारीमध्ये साखरपुडा किंवा लग्न करणार नाही. असे दिसते की मीडिया दर दोन वर्षांनी माझे लग्न करू इच्छित आहे. ही अफवा मी दरवर्षी ऐकतो. मीडिया फक्त मी लग्न करण्याची वाट पाहत आहे.’

महत्वाच्या बातम्या-

मंदिर नको तर रोटी, कपडा, मकान, शिक्षण आणि आरोग्य हवंय; नक्षलवाद्यांची कोल्हेकुई झाली सुरु

Ram Mandir Pran Pratishta : राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळा थांबवला जाणार?

Women’s Health: 50 व्या वर्षी निरोगी राहू इच्छिता? रोज ही एक गोष्ट खायला सुरुवात करा