मंदिर नको तर रोटी, कपडा, मकान, शिक्षण आणि आरोग्य हवंय; नक्षलवाद्यांची कोल्हेकुई झाली सुरु

Ram Mandir Pran Pratishta : अयोध्येतील भगवान श्रीरामाच्या भव्य मंदिराच्या उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. 22 जानेवारी रोजी मंदिराच्या गर्भगृहात रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी जगभरात उत्साह असून अयोध्येत मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू आहे. एका बाजूला हे सर्व सुरु असताना दुसऱ्या बाजूला नक्षलवाद्यांच्या पोटात दुखायला सुरुवात झाली आहे.

नक्षलवाद्यांनी (Naxal) राम मंदिराच्या उद्घाटनाला स्पष्ट विरोध दर्शवला आहे नक्षलवाद्यांच्या दंडकारण्य क्रांतिकारी आदिवासी महिला संघटनेने राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार घाला अशी मागणी करणारा पत्रकच काढले आहे. राम महिला विरोधी होते, राम राज्य आदर्श राज्य नव्हते अशी जहाल भाषा या पत्रकात आहे.

अयोध्येत होत असलेल्या राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचा बहिष्कार करा.. आम्हाला मंदिर नको तर रोटी, कपडा, मकान, शिक्षण आणि आरोग्य हवंय.. अशा आशयाचा पत्रक काढून नक्षलवाद्यांच्या महिला आघाडीने राम मंदिर उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार घालण्यास सांगितले आहे. नक्षलवाद्यांच्या क्रांतिकारी आदिवासी महिला संघटनेने हे पत्रक काढून राम मंदिर उदघाटन सोहळ्याचे सर्वांनी बहिष्कार करावे असा इशाराच दिला आहे.ABP माझाने याबाबत वृत्त दिले आहे.

महत्वाच्या बातम्या-

राम मंदिर होतंय याचा आनंद; मांस विक्री करणार नाही; कुरेशी समाजाचा निर्णय

Facebook Scam: महिलेला गरोदर करण्याचे 10 लाख रुपये मिळतील… या गर्भधारणेच्या घोटाळ्याला बळी पडू नका!

दोन भावांनी राम मंदिरासाठी बनवला सोन्या-चांदीचा झाडू, लवकरच अयोध्येला पाठवणार