LokSabha Election 2024 | परभणी लोकसभेसाठी राजेश विटेकर तर अकोल्यासाठी संदीप पाटील यांच्यावर समन्वयक पदाची जबाबदारी…

LokSabha Election 2024 | परभणी आणि अकोला लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी ‘समन्वयक’ पदाची नियुक्ती केली आहे.

परभणी लोकसभा मतदारसंघासाठी प्रदेश उपाध्यक्ष राजेश विटेकर तर अकोला मतदारसंघासाठी संदीप पाटील यांच्यावर समन्वयक पदाची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी सोपवली आहे.

महायुती आणि घटक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी व प्रमुख मान्यवरांशी संपर्क करुन उमेदवारासाठी प्रचार यंत्रणा व निवडणूक (LokSabha Election 2024) जास्तीत जास्त मताधिक्याने जिंकण्याच्यादृष्टीने समन्वय करण्याचे आदेश प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिले आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Narayan Rane | पुण्याची खासदारांची विशेष परंपरा मुरलीधर मोहोळ जोपासणार

Uddhav Thackeray | मुंबईतल्या २ जागा मित्रपक्षाला दिल्यात, ते लढणार नसतील तर आम्ही लढू

Vasant More | “२५ वर्ष ज्या पक्षात एकनिष्ठ राहिलो, तिथे न्याय मिळाला नाही”; वसंत मोरेंनी बोलून दाखवली खंत