Pune News | पुणे शहरात टोळक्याने भररस्त्यात तिघांना कोयत्याने सपासप कापलं, सीसीटीव्हीत घटना झाली कैद

Pune News | गेल्या काही महिन्यांत पुणे शहरात गुडांनी उच्छाद माजवल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशातच आता पुन्हा एकदा पुण्याच्या शांतीला भंग करणारी घटना समोर आली आहे. खडकवासला (Pune News) परिसरात गुंडांच्या जमावाने तीन तरुणांवर कोयता व तलवारीने वार केल्याची घटना समोर आली आहे. जवळच्या सीसीटीव्हीत हा संपूर्ण प्रकार कैद झाला असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे पुणे परिसरात खळबळ उडाली असून पुणे पोलिस प्रकरणाचा तपास करत आहेत.

गोऱ्हे बुद्रुक गावात १०-१२ जणांच्या टोळ्यांनी तीन तरुणांवर हल्ला केल्याचे व्हिडिओत दिसत आहे. सुरुवातीला हे गुंड गाडीवर बसून तरुणाची वाट पाहताना दिसत आहेत. पुढे तरुण दिसताच त्यांनी त्यांची गाडी अडवून त्यांच्यावर कोयता आणि तलवारीने सपासप वार केल्याचे दिसत आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाले आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या : 

Mahesh Tapase | गुजरातच्या भूकंपावेळी मदतीला सर्वात प्रथम धावणारे शरद पवारांच्या योगदानाचा शहांना विसर

Amit Shah | अमित शाहांना घराणेशाहीवर बोलण्याचा अधिकार नाही, जय शाह कोणता क्रिकेट खेळला म्हणून बीसीसीआयचा सचिव केला?

Loksabha Election 2024 | “मतांसाठी शहीदांचा बाजार मांडला, उलट तुम्हाला लाज वाटली पाहिजे”, शाहांच्या विधानानंतर राऊतांनी सगळंच काढलं