Lok Sabha Elections 2024 | भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांना उमेदवारी हीच मोदींची गॅरंटी ; संजय राऊत यांची घणाघाती टीका

भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ( Lok Sabha Elections 2024) 16 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांसाठी आपल्या 195 उमेदवारांची पहिली यादी नुकतीच  जाहीर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह लखनऊमधून, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गांधीनगरमधून आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी अमेठी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने उत्तर प्रदेशातील 51, पश्चिम बंगालमधील 20, मध्यप्रदेशातील 24, गुजरात आणि राजस्थानमधील प्रत्येकी 15, केरळमधील 12, तेलंगणातील 9 आणि आसाम, झारखंड आणि छत्तीसगडमधून प्रत्येकी 11 उमेदवारांची नावं जाहीर केली. दिल्लीतून 5, जम्मू आणि काश्मीरमधून 2, उत्तराखंडमधून 3, अरुणाचल प्रदेशमधून तर गोवा, त्रिपुरा, अंदमान आणि निकोबार तसच दमण आणि दीवमधून प्रत्येकी एक उमेदवार जाहीर केला आहे.

दरम्यान,भाजपने लोकसभेसाठी ( Lok Sabha Elections 2024) जाहीर केलेल्या पहिल्या यादीत १९५ पैकी कृपाशंकर सिंह यांच्यासारखे जवळपास ७० उमेदवार हे बेहिशेबी मालमत्ता प्रकरणाशी संबंधित आर्थिक घोटाळ्यातील असून उर्वरित यादीत यापेक्षा वेगळे काही असणार नाही. विविध पक्षातील व्यक्तींवर भ्रष्टाचाराचे आरोप करून तुरुंगात टाकण्याची धमकी द्यायची आणि नंतर त्यांना भाजपकडून उमेदवारी द्यायची. हीच मोदी गॅरंटी आहे, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी येथे केली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या : 

समृद्धी महामार्गावर भलामोठा खड्डा, दीड वर्षातच समृद्धी महामार्गाच्या कामाचे पितळ उघडे पडले

Republican Party | आगामी निवडणुकीत महायुतीला विजयी करण्याचा रिपब्लिकन पक्षाचा संकल्प

भोई समाजातील सर्व पोट जातींनी एकत्र येऊन काम करावे – Chhagan Bhujbal