Sanjay Raut | सुनेत्रा पवार यांनी फडणवीसांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा खटला करावा

Sanjay Raut – कोणत्याही परिस्थितीत बारामतीत विजय मिळवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीने निर्धार केला आहे. यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या मैदानात उतरणार असल्याची चर्चा असून त्यांनी गाठीभेटी घेण्याचा धडाका लावला आहे.

दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सुनेत्रा पवार यांना एक अजब सल्ला दिला आहे. अजित पवार यांची बदनामी केली म्हणून सुनेत्रा पवार यांनी खरेतर फडणवीस आणि भाजप विरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल करून बारामतीत मते मागावीत, असा सल्ला त्यांनी दिला.

हुकुमशाहीचा पराभव करण्यासाठी, संविधानाच्या रक्षणासाठी प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीबरोबर राहायला हवे, अशी राज्यभरातील लोकांची भावना असल्याचे खासदार राऊत यांनी नमूद केले. आंबेडकर हे राज्यात जिथे जातील, तिथे संविधान रक्षणाची भूमिका मांडत आहेत. लोक त्यांना प्रतिसाद देत आहेत. उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले, राहुल गांधी, बाळासाहेब थोरात आदी नेत्यांनी देशात परिवर्तन घडवून आणण्याचे ठरवले आहे. २०२४ मध्ये हे परिवर्तन घडून न आल्यास देशातील ही शेवटची निवडणूक असेल आणि खऱ्या अर्थाने हुकूमशाहीला सुरुवात होईल, अशी भीती राऊत यांनी व्यक्त केली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या : 

समृद्धी महामार्गावर भलामोठा खड्डा, दीड वर्षातच समृद्धी महामार्गाच्या कामाचे पितळ उघडे पडले

Republican Party | आगामी निवडणुकीत महायुतीला विजयी करण्याचा रिपब्लिकन पक्षाचा संकल्प

भोई समाजातील सर्व पोट जातींनी एकत्र येऊन काम करावे – Chhagan Bhujbal