Lok Sabha Elections 2024 | लोकसभेसाठी तिकीट कापल्यानंतर भाजपच्या ‘या’ मातब्बर नेत्याने केला राजकारणालाच राम-राम

भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections 2024) 16 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांसाठी आपल्या 195 उमेदवारांची पहिली यादी नुकतीच  जाहीर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) वाराणसीतून, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) लखनऊमधून, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) गांधीनगरमधून आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी अमेठी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने उत्तर प्रदेशातील 51, पश्चिम बंगालमधील 20, मध्यप्रदेशातील 24, गुजरात आणि राजस्थानमधील प्रत्येकी 15, केरळमधील 12, तेलंगणातील 9 आणि आसाम, झारखंड आणि छत्तीसगडमधून प्रत्येकी 11 उमेदवारांची नावं जाहीर केली. दिल्लीतून 5, जम्मू आणि काश्मीरमधून 2, उत्तराखंडमधून 3, अरुणाचल प्रदेशमधून तर गोवा, त्रिपुरा, अंदमान आणि निकोबार तसच दमण आणि दीवमधून प्रत्येकी एक उमेदवार जाहीर केला आहे.

दरम्यान, दिल्लीमधील चांदणी चौकचे खासदार आणि भाजपाचे वरिष्ठ नेते डॉ. हर्षवर्धन यांनी राजकारणाला राम राम ठोकून निवृत्ती जाहीर केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections 2024) भाजपाने त्यांचे तिकीट कापल्यानंतर त्यांनी हा निर्णय जाहीर केला. डॉ. हर्षवर्धन हे याच मतदारसंघातून पाच वेळा आमदार आणि दोन वेळा खासदार राहिले आहेत. त्यांनी केंद्रीय आरोग्य आणि पर्यावरण मंत्री म्हणून काम केले होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या : 

समृद्धी महामार्गावर भलामोठा खड्डा, दीड वर्षातच समृद्धी महामार्गाच्या कामाचे पितळ उघडे पडले

Republican Party | आगामी निवडणुकीत महायुतीला विजयी करण्याचा रिपब्लिकन पक्षाचा संकल्प

भोई समाजातील सर्व पोट जातींनी एकत्र येऊन काम करावे – Chhagan Bhujbal