Lok Sabha Elections | भाजपने उमेदवारी दिलेल्या बांसुरी स्वराज नेमक्या कोण आहेत ? त्या काय करतात ?

भाजप ने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections) 16 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांसाठी आपल्या 195 उमेदवारांची पहिली यादी नुकतीच जाहीर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह लखनऊमधून, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गांधीनगरमधून आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी अमेठी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. दरम्यान, भाजपने यंदा स्व. सुषमा स्वराज यांची कन्या बांसुरी स्वराज (Bansuri Swaraj) यांना मैदानात उतरवले आहे.

बांसुरी स्वराज या सर्वोच्च न्यायालयात वकिली करतात. दिल्ली बार कौन्सिलमध्ये त्यांनी २००७ मध्ये प्रवेश घेतला. दिल्लीत त्या मागच्या १६ वर्षांपासून वकिली करत आहेत. त्यांनी साहित्य हा विषय घेऊन वॉरवरिक विद्यापीठातून बी ए ऑनर्सचा कोर्स केला आहे. तसंच त्यांनी लंडन येथील बीपीपी लॉ स्कूलमधून वकिलीचं शिक्षण घेतलं तर ऑक्सफोर्ड विद्यापीठातून त्यांनी मास्टर्स केलं आहे.

भाजपाचे दिल्लीचे प्रमुख वीरेंद्र सचदेवा यांना जेव्हा प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली तेव्हा बांसुरी स्वराज यांना भाजपाच्या कायदा विभागाच्या सहसंयोजक पदाची जबाबदारी देण्यात आली. आता त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections) उमेदवारी देण्यात आली आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या : 

समृद्धी महामार्गावर भलामोठा खड्डा, दीड वर्षातच समृद्धी महामार्गाच्या कामाचे पितळ उघडे पडले

Republican Party | आगामी निवडणुकीत महायुतीला विजयी करण्याचा रिपब्लिकन पक्षाचा संकल्प

भोई समाजातील सर्व पोट जातींनी एकत्र येऊन काम करावे – Chhagan Bhujbal