Lok Sabha Elections 2024 | भाजपाकडून बॉलिवूडसह भोजपुरी, दाक्षिणात्य कलाकारांना लोकसभेची उमेदवारी; वाचा यादी

भाजप ने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections 2024) 16 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांसाठी आपल्या 195 उमेदवारांची पहिली यादी नुकतीच जाहीर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) वाराणसीतून, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह लखनऊमधून, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गांधीनगरमधून आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी अमेठी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. दरम्यान, पक्षाने चित्रपट आणि टीव्ही कलाकारांनाही निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे.

सत्ताधारी पक्षाने बॉलिवूड, भोजपुरी, बंगाली, दाक्षिणात्य चित्रपट आणि मालिकांमधील अभिनेते तसेच अभिनेत्रींना लोकसभेचं तिकीट दिलं आहे. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी या उत्तर प्रदेशमधील मथुरा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार आहेत. भाजपाने त्यांना यंदा तिसऱ्यांदा मथुरेतून लोकसभेच्या रिंगणात उतरवलं आहे.

भाजपाने गोरखपूरचे विद्यमान खासदार आणि अभिनेते रवी किशन यांना पुन्हा एकदा लोकसभेचं (Lok Sabha Elections 2024) तिकीट दिलं आहे. सोबतच उत्तर पूर्व दिल्लीचे खासदार आणि अभिनेते मनोज तिवारी यांच्यावर भाजपाने पुन्हा एकदा विश्वास टाकला आहे.केरळच्या त्रिसुर मतदारसंघातून अभिनेता सुरेश गोपी याला लोकसभेच्या रिंगणात उतरवलं आहे. तसेच आझमगड लोकसभा मतदारसंघातून भोजपुरी स्टार दिनेश लाल यादव निरहुआ याला तिकीट दिलं आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या : 

समृद्धी महामार्गावर भलामोठा खड्डा, दीड वर्षातच समृद्धी महामार्गाच्या कामाचे पितळ उघडे पडले

Republican Party | आगामी निवडणुकीत महायुतीला विजयी करण्याचा रिपब्लिकन पक्षाचा संकल्प

भोई समाजातील सर्व पोट जातींनी एकत्र येऊन काम करावे – Chhagan Bhujbal