मोठी बातमी ! ड्रग्ज माफिया Lalit patil प्रकरणात महिला पोलीस अधिकारी निलंबित 

Lalit Patil case – ड्रग्ज माफिया ललित पाटील सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. अंमली पदार्थांप्रकरणी पोलीस तपासात रोज नवनवीन माहिती समोर येतेय.  दुसऱ्या बाजूला ललित पाटीलच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप देखील करताना पाहायला मिळत आहेत.(pune Crime News)

यातच आता ललित पाटील  हा ससूनमधून पळून गेल्याप्रकरणी आणखी एका महिला पोलीस अधिकाऱ्याला निलंबित (Woman police officer suspended) करण्यात आले आहे. सविता हनुमंत भागवत (Savita Hanumant Bhagwat) असे या सहायक पोलीस निरीक्षक महिलेचे नाव आहे. ससूनच्या १६ नंबर वॉर्डमध्ये लक्ष ठेवण्याची जबाबदारी असताना देखील त्यामध्ये कसूर केल्याचा ठपका पोलीस आयुक्त आणि सह आयुक्तांनी ठेवला आहे.

३० सप्टेंबर रोजी दिवसपाळी असतानाही कर्तव्यावर हजर न राहता केवळ अर्धा तास उपस्थित राहिल्यामुळे ललितला एक अज्ञात व्यक्ती भेटली आणि त्यानंतर तो पसार झाला. त्यामुळे कर्तव्यातील निष्काळजीपणा, हलगर्जीपणा व बेजबाबदारपणामुळे आरोपी ललित अनिल पाटील याला पोलिसांच्या हातावर तुरी देत पळून जाण्यास संधी मिळाली, असे नमूद करीत निलंबनाचे आदेश देण्यात आले आहेत. सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांनी हे आदेश काढले आहेत. यापूर्वी दोन अधिकाऱ्यांसह नऊ पोलिसांना निलंबित करण्यात आले होते. सिव्हिक मिरर ने याबबत वृत्त दिले आहे.

महत्वाच्या बातम्या-

ऑस्ट्रेलियाच्या झंझावाती विजयाने पाकिस्तान विश्वचषकातून बाहेर जाण्याच्या मार्गावर ?

धक्कादायक ! ललित पाटीलला पुण्याबाहेर पळवण्यात ‘या’ व्यक्तीचा होता हात

इंग्लंडविरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्यापूर्वी भारतासाठी चिंता वाढवणारी बातमी, हार्दिकच्या फिटनेसबद्दल मोठी अपडेट