Dharashiv Crime | धाराशिव येथे अनैतिक देह व्यापार करणाऱ्या आरोपीविरुद्ध पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाची कारवाई

धारशिव (Dharashiv Crime) शहरातील बालाजीनगर येथे एक महिला काही महिलांद्वारे वेश्या व्यवसाय (Prostitute business) करवून घेत होती याची माहीती मिळताच सदर ठिकाणी पोलिस पथकाने सोमवार दि. ११ रोजी छापा टाकला असता बालाजीनगर घरामध्ये तीन महिला आढळून आल्याने सदरील महिला विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

या बाबतीत अधिक माहिती अशी की, बालाजीनगर येथे भाग्यश्री नारायण इंगळे, वर्षे, रा. बालाजीनगर शेकापूर रोड धाराशिव या महिलेस वाणिज्यिक प्रयोजनाकरीता आश्रय देउन त्यास लैंगीक स्वैराचाराकरीता परावृत्त (Dharashiv Crime) करत होती व नमुद आरोपी ही त्यावर स्वत:ची उपजिवीका करत आहेत अशी माहीती समजताच पोलिसांनी तिथे छापा टाकून भाग्यश्री नारायण इंगळे, वय 40 वर्षे, रा. बालाजीनगर शेकापुर रोड धाराशिव यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातील एक मोबाईल फोन, निरोधची पाकीटे व रोख रक्कम असा एकुण 17,508 ₹ माल हस्तगत केला. पोलीसांनी संबंधीत वेश्या व्यवसाय करणाऱ्या आरोपीच्या ताब्यातून त्या महिलांची सुटका करुन आरोपी नामे- भाग्यश्री नारायण इंगळे, वय 40 वर्षे,  रा. बालाजीनगर शेकापुर रोड धाराशिव यांचेविरुद्ध गुरनं 105/2024 भा.दं.वि. सं. कलम- 370, सह मानवी अनैतिक व्यवसाय प्रतिबंधक अधिनियम कलम- 3, 4, 5, 7 अन्वये धारशिव शहर पोलीस ठाण्यात दि. 11.03.2024 रोजी गुन्हा नोंदवला आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व मा. अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या आदेशावरुन व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक- वासुदेव मोरे, विशेष पथकाचे सपोनि अमोल मोरे, सचिन खटके, पोहेकॉ विनोद जानराव, समाधान वाघमारे, पोलीस नाईक नितीन जाधवर, मपोहेकॉ शोभा बांगर, चालक पोहेकॉ लाटे यांच्या पथकाने केली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

CAA Act | भारताचा CAA कायदा काय आहे? ज्याबाबत मोदी सरकारने अधिसूचना जारी केली, वाचा सर्वकाही

Pankaja Munde | पाच वर्षांचा वनवास खूप झाला, आता वनवास नको

Ajit Pawar | पुण्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाला शासनाचे प्राधान्य