“माझ्या मुलाने मोठा गुन्हा केला नाही, समाजासाठी…”, सदावर्तेंची गाडी फोडणाऱ्या मंगेश साबळेंच्या आईची विनंती

Gunratna Sadavarte : काही दिवसांपूर्वी वकिल गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) लढत असलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना अटक करण्याची भाषा केली होती. यामुळे मराठा समाजात गुणरत्न सदावर्तेंबद्दल रोष होता. त्या रागातूनच गुरुवारी सकाळी काही आंदोलकांनी सदावर्ते यांच्या गाडीच्या काचा फोडल्याचा प्रकार घडला आहे. गुणरत्न सदावर्ते मुंबईतल्या हिंदमाता परिसरातल्या क्रिस्टल टॉवर्स या १६ मजली इमारतीत राहतात. याठिकाणी हा प्रकार घडला.

पोलिसांनी याप्रकरणी मंगेश साबवे, वसंत बनसोडे, राजू सावे यांना ताब्यात घेतले होते.  हे तिघेही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रहिवासी आहेत.  गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte)यांनी यासाठी मनोज जरांगे जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, सदावर्ते यांचे सर्व आरोप मनोज जरांगे यांनी फेटाळून लावले आहे. सदावर्ते यांच्याबद्दल आम्हाला काहीच बोलायचं नाही, मात्र, त्यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याचे आम्ही समर्थन करणार नसल्याचे जरांगे म्हणाले आहेत.

दुसऱ्या बाजूला आता याप्रकरणी मंगेश साबळेच्या आईने प्रतिक्रिया दिली आहे. मंगेश साबळेच्या आई म्हणाल्या की, माझ्या मुलाने मोठा गुन्हा केला नाही. तो समाजासाठी लढतोय. त्याला न्याय दिला पाहिजे. गाड्या फोडणे हा मोठा गुन्हा नाही. सरकार आरक्षण देत नाहीय, त्यामुळे माझ्या मुलाने हे पाऊल उचललं आहे. मी त्याचं समर्थन करते.माझा त्याला पूर्ण पाठिंबा आहे. तो समाजासाठी लढतो आणि मला त्याचा खूप अभिमान आहे. त्याने मोठा गुन्हा केला नाहीय, त्याला सोडून द्यावं, अशी विनंतीही त्यांनी सरकारकडे केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

ऑस्ट्रेलियाच्या झंझावाती विजयाने पाकिस्तान विश्वचषकातून बाहेर जाण्याच्या मार्गावर ?

धक्कादायक ! ललित पाटीलला पुण्याबाहेर पळवण्यात ‘या’ व्यक्तीचा होता हात

इंग्लंडविरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्यापूर्वी भारतासाठी चिंता वाढवणारी बातमी, हार्दिकच्या फिटनेसबद्दल मोठी अपडेट