विरोधकांची नाचक्की; शिंदे सरकार जिंकलं; विरोधकांनी शंभरीही गाठली नाही

Mumbai – शिंदे सरकारने 164 मतांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. तर विरोधकांच्या बाजूने केवळ 99 मतदान झाले. एकनाथ शिंदे सरकारतर्फे सुधीर मुनगंटीवार यांनी विश्वासदर्शक ठराव मांडला आणि त्याला भरत गोगावले यांनी अनुमोदन दिले. यावेळी विरोधी पक्षाने मतविभागणीची मागणी केली आणि ती अध्यक्षांनी मान्य केली.

दरम्यान, सरकारला शंभरीही गाठता आली नाही, त्यामुळे नामुष्की ओढवली. समाजवादी पक्ष, एमआयएम या पक्षांनी तटस्थ भूमिका घेतली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी चाचणीचा निकाल जाहीर केला. त्यानंतर त्यांनी सरकारने विश्वासदर्शक प्रस्ताव संमत झाल्याचे त्यांनी घोषित केले. काँग्रेसचे जवळपास पाच आमदार अनुपस्थित राहिले.