Mahavitaran Strike : संपकरी कर्मचाऱ्यांना अखेर मेस्मा लावला, आंदोलन चिघळणार

Mahavitaran Strike : – महावितरण विभागाचे खाजगीकरण करू नये यासाठी महावितरणचे कर्मचारी मध्यरात्रीपासून संपावर गेले आहेत. या संपाच्या प्रभाव राज्यातील अनेक जिल्ह्यात आज पहाटेपासूनच दिसू लागला. अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडीत झाला आहे .

महावितरणचे कर्मचारी, अधिकारी आणि अभियंत्यांच्या विविध संघटना आजपासून 6 जानेवारीपर्यंत 72 तासांच्या संपावर गेले आहेत. दरम्यान या संपाला महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघासह अनेक संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे.

आता वीज कर्मचाऱ्यांना इशारा देऊनही आंदोलन मागे न घेतल्याने राज्य सरकारने मेस्मा म्हणजे अत्यावश्यक सेवा कायदा लागू  केला आहे.  सरकारने हा कायदा लागू केल्याने संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार आहे. सरकारच्या इशाऱ्यानंतरही संपकरी कर्मचारी आपल्या आंदोलनावर ठाम आहेत.